बीड : बीडमध्ये 11 वर्षीय मुलीवर मौलाना तीन महिन्यापासून बलात्कार(rape) करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.शिक्षक दिनाच्या दिवशीच या नराधमावर पेठ बीड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रियाज शेख असे आरोपीचे नाव असून त्याला पेठ बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बीड शहरातील मोमीन पुरा भागात राहणारा रियाज त्याच्या राहत्या घरी उर्दू व अरबी भाषेची शिकवणी घेत होता. यामध्ये प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी होती. पत्नी आणि मुले घरी नसताना त्याने हे दुष्कर्म केले असल्याचे आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार(rape) केल्याचेही म्हटले आहे.
प्रकरणांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.मुलीने आई-वडिलांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून आई- वडिलांनी तात्काळ पेट बीड पोलीस ठाणे गाठले असून पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. हा प्रकर समोर आल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीवर लैंगिरत अत्याचार उर्दू शिक्षकाने केले आहे. त्यानंतर मौलानाला अटक केली आहे. फिर्यादी आणि तिच्या आईला पोलीस स्टेशनला बोलवले.
तसेच शांतता समितीचे सदस्य बोलवून व्हिडीओ रेकॉर्डिंग करत जबाब नोंदवला. पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी इतर मुलांना बाहेर पाठवायचा आणि मुलीवर अत्याचार करत असे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून आरोपीस अटक केली आहे.
हेही वाचा:
गणपती बाप्पाच्या नावापुढे ‘मोरया’ का म्हटलं जातं?
कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळले
पत्नीला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या भावाने थेट भावालाच संपवलं