World Bicycle Day 2021: सायकलिंग एक उत्तम व्यायाम; होतील ‘हे’ फायदे

World Bicycle Day 2021: सायकलिंग एक उत्तम व्यायाम; होतील ‘हे’ फायदे

आजच्या काळात बहुसंख्य लोक स्कूटर, मोटारसायकल, कार ही स्वयंचलित वाहनं मोठ्या प्रमाणात चालवतात. कामासाठी प्रवास करण्यासाठी अनेकदा या वाहनांशिवाय (Vehicles) पर्याय नसतो. त्यामुळं सायकल चालवणे (Cycling) हे आता शालेय आयुष्यापुरते किंवा व्यायामासाठी जिममध्ये किंवा ज्यांना सायकल आवडते त्यांच्यापुरते मर्यादित राहिले आहे. खरंतर, सायकल चालवणे (Cycling) हा एक उत्तम व्यायाम आहे.सध्याच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या काळात सायकल चालवण्याचा व्यायाम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आरोग्यदायी आहे. योग (Yoga) आणि व्यायामाप्रमाणे (Exercise) सायकल चालवल्यानं हृदय (Heart) आणि फुफ्फुसांचे (Lungs) आरोग्य चांगले राहते. सकाळी सायकल चालवल्यामुळे दिवसभर ऊर्जा (Energy) मिळते आणि रात्री झोपही (Sleep) चांगली येते. आज जागतिक सायकलिंग दिवस (World Cycling Day 2021) आहे. या निमित्ताने सायकल चालवण्याचे काही फायदे जाणून घेऊ या…

तरुण दिसण्यास होते मदत :

व्यायाम म्हणून काही वेळ सायकल चालवण्यामुळे रक्त पेशी (Blood Cells) आणि त्वचेला (skin) पुरेसा ऑक्सिजन मिळतो. त्यामुळं त्वचा निरोगी आणि तजेलदार होते. त्यामुळं तुम्ही खूपच तरुण दिसू लागता.

रात्री चांगली झोप लागते:

तुम्ही सकाळी काही वेळ सायकल चालवत असाल तर तुम्हाला रात्री चांगली झोप (Sleep) येईल. सकाळी लवकर सायकल चालवण्यानं तुम्हाला थोडा थकवा येत असला तरी तो थोड्या काळासाठीच असेल. त्यानंतर संपूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जा मिळेल.

रोगांपासून दूर राहाल:

सायकलिंगमुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी (Immunity) अधिक सक्रिय होतात, त्यामुळं आजारपण कमी येते.लैंगिक शक्तीत वाढ :

सायकलिंगमुळे शरीराचे सर्व स्नायू (Muscles) निरोगी आणि मजबूत बनतात. त्यामुळं लैंगिक शक्तीदेखील वाढते. सायकलिंग करणाऱ्या व्यक्ती अधिक अॅक्टीव्ह असतात.

स्मरणशक्ती वाढेल:

सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूच्या पेशी (Brain Cells) अधिक सक्रिय असतात. त्यामुळं त्यांची स्मरणशक्ती (Memory) इतर लोकांपेक्षा अधिक चांगली असते. सायकलिंगमुळे मेंदूत नवीन पेशीही तयार होतात.

हृदय निरोगी राहते :

सायकल चालवल्यानं हृदय निरोगी राहते. सायकलिंग केल्यानं संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण (Blood Circulation) उत्तम रीतीनं होण्यास मदत मिळते.वजन कमी करण्यास उपयुक्त :

नियमित व्यायाम म्हणून सायकलिंग केल्यास शरीरातील कॅलरी (Calory) आणि चरबी (Fat) कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन (Weight) कमी होते. शरीरयष्टी सडपातळ राहण्यास मदत होते.

फुफ्फुस मजबूत होतात :

सायकल (Cycling)  चालवताना आपण नेहमीपेक्षा अधिक खोल श्वास घेतो पर्यायानं अधिक ऑक्सिजन घेतो. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि त्याच वेळी फुफ्फुसांमध्ये हवा वेगानं आतबाहेर होते. यामुळे फुफ्फुसांची क्षमता सुधारते आणि फुफ्फुस मजबूत होतात.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *