धोनीचा CSK मधला सहकारी म्हणतो, याबाबतीत IPL पेक्षा PSL(पाकिस्तान सुपर लीग) भारी!

धोनीचा CSK मधला सहकारी म्हणतो, याबाबतीत IPL पेक्षा PSL(पाकिस्तान सुपर लीग) भारी!

जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) खेळण्याचं प्रत्येक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूचं स्वप्न असतं. पैशांबरोबरच मोठे खेळाडू सहभागी होत असल्यामुळे तसंच स्पर्धा अत्यंत उत्कंठा वाढवणारी होत असल्यामुळे आयपीएल (IPL) ही जगातली सगळ्यात यशस्वी लीग आहे.


आयपीएलच्याच धर्तीवर जगात बांगलादेश प्रीमियर लीग (BPL), पाकिस्तान सुपर लीग (PSL) आणि बिग बॅश लीग (BBL) या टी-20 स्पर्धा सुरू झाल्या. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) याला मात्र एका बाबतीत आयपीएलपेक्षा पीएसएल चांगली असल्याचं वाटतं.

पोटावरची चरबी कमी करायची आहे? करून पाहा हे सोपे उपाय

फाफ डुप्लेसिस आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळतो, तर पीएसएलमध्ये तो क्वेट्टा ग्लॅडिएटर्सच्या टीममध्ये आहे. पीएसएलमध्ये आयपीएलपेक्षा(IPL)फास्ट बॉलिंगचा स्तर चांगला आहे, तर आयपीएलमध्ये स्पिन बॉलिंगमध्ये विविधता आहे, असं डुप्लेसिस म्हणाला. पाकिस्तान क्रिकेटसोबत डुप्लेसिस बोलत होता.


महाराष्ट्रात शुटींगला परवानगी; नियमांत शिथिलता आणून चित्रिकरण होणार सुरू

पीएसएलमध्ये खेळाचा स्तर चांगला आहे. इथल्या फास्ट बॉलिंगने मला प्रभावित केलं. दक्षिण आफ्रिकेत तुम्ही फास्ट बॉलिंगचा सामना करून मोठे होता.

पीएसएलमध्ये बहुतेक फास्ट बॉलर 140 किमी प्रती तास या वेगाने बॉलिंग करतात, हे पाहून मी हैराण झालो. पीएसएलचं वेगळेपण ही त्याची फास्ट बॉलिंग आहे,’ असं वक्तव्य डुप्लेसिसने केलं.

सनी लिओनीने शेअर केला ‘हिडेन बर्थडे व्हिडीओ’; सोशल मीडियावर व्हायरल‘भारतामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पिन बॉलिंगचा सामना करता. आयपीएलमध्ये या गोष्टी दिसतात,’ असं डुप्लेसिसने सांगितलं. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल स्पर्धा 29 सामन्यांनंतर 4 मे रोजी स्थगित करण्यात आली. आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचं युएईमध्ये आयोजन करण्यात येणार आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *