पोटावरची चरबी कमी करायची आहे? करून पाहा हे सोपे उपाय

पोटावरची चरबी कमी करायची आहे? करून पाहा हे सोपे उपाय

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अती लठ्ठपणा (Obesity) ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अगदी लहान वयापासून वयाच्या मानाने खूपच जास्त वजन असलेली मुले आढळतात. तरूणामध्येसुद्धा हे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. या अती लठ्ठपणाच्या समस्येमुळे आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवत आहेत.रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार यासारख्या आजारांचा धोका लठ्ठ व्यक्तींमध्ये अधिक असतो.


लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण आजच्या जीवनशैलीत (Lifestyle) आहे. आजकाल बहुसंख्य लोक एका जागी बसून एसीमध्ये काम करतात. व्यायाम केला (Exercise) जात नाही. जंकफूड (Junk food) खाण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या वेळा रात्री उशिरापर्यंत असल्यानं तसंच कामाचा ताण यामुळे झोपपूर्ण होत नाही. यामुळे वजन झपाट्यानं वाढतं. पोट, मांड्या या भागांवर अतिरिक्त चरबी वाढते.

वाढत्या वजनामुळे इतर त्रास उद्भवण्यास सुरुवात झाली की लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नांकडे वळतात. त्यासाठी वेगवेगळ्या आहार पद्धती, व्यायामाचे निरनिराळे प्रकार अवलंबले जातात. तरीही अनेकदा वजनकमी होत नाही. पोटावरची चरबी (Belly Fat) अजिबात कमी होत नाही. यामागे अनेक कारणे असतात. त्यापैकी काही महत्त्वाची कारणे जाणून घेऊन ती दूर केल्यास वजन कमी करण्यासह पोटावरची चरबी कमी करण्यातही यश येईल.

पौष्टिक पदार्थ खा आणि योग्य प्रमाणात पाणी प्या

प्रमाणापेक्षा अधिक वजन वाढते तेव्हा सर्वांत जास्त चरबी (Fat) साठते ती पोट, कंबर, मांड्या या भागांवर. विशेषतः स्त्रियांमध्ये या भागांवर चरबी साठल्याचे दिसून येते. आपलाही बांधा सडपातळ व्हावा अशी इच्छा असणाऱ्या महिलांना पोटावरील चरबी सर्वाधिक त्रास देत असते. ही चरबी कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात; मात्र यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे ते कॅलरीज (Calories) नियंत्रित करणं. पण कॅलरीज कमी करायच्या म्हटलं की बहुतेकजण आहारातून (Diet) पौष्टिक पदार्थ  वगळून टाकतात. याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.



शरीरातील स्नायू कमकुवत होतात आणि शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळं खाण्याची इच्छा अधिक तीव्र होते. परिणामी पोटाची चरबी (Belly Fat) आणि वजन (Weight) काही केल्या कमी होत नाही. यामुळे कॅलरीज नियंत्रित करण्यासाठी योग्य पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणं आणि भरपूर पाणी पिणं (Water) महत्त्वाचं आहे.

तुम्ही भरपूर पाणी पीत असाल तर तुम्हाला दीर्घ काळ भूक लागत नाही. जेवण करण्यापूर्वी पाणी आवर्जून प्यावं, त्यामुळं अन्नाची तलफ कमी होते आणि आपोआपच कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. तुमच्या शरीराला आवश्यक तेवढं पाणी घेत नसाल तर आपल्या पोटावरील चरबी कमी करणं अवघड होतं.

मद्यपान टाळा

अल्कोहोलचं (Alcohol) सेवन करण्याची सवय हा वजन कमी (Weight Loss) करण्यातील मोठा अडथळा आहे. दारू पिण्यानं पोट (Belly) आणि कंबरभोवती चरबी जमा होते. बहुतांश अल्कोहोलमध्ये साखरेचं (Sugar) प्रमाण अधिक असतं त्यामुळं वजन झपाट्यानं वाढतं. कारण साखर हे वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळं वजन कमी करायचं असेल तर दारू पिणे टाळा.

अपुरी झोप आणि ताण वाढवतील वजन

वजनवाढण्या (Obesity)  मागचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे अपुरी झोप (Sleep). माणसाला किमान सात ते आठ तासांची शांत झोप आवश्यक असते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनचे (Cortisol Harmons) प्रमाण वाढते त्यामुळं आपल्याला अधिक कॅलरीयुक्त अन्न खाण्याची तीव्र इच्छा होते आणि वजन वाढते. वजन कमी करायचे असेल तर किमान 7 ते 8 तासांची झोपे घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

चीनची कोरोना लस घेणं या देशांना पडलं महागात

याचप्रमाणे ताण (Stress) हे देखील वजन वाढण्याचे मोठे कारण आहे. ताणतणावामुळेही शरीरात कोर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण वाढतं, ज्यामुळे पाचक क्रिया मंदावते आणि खाण्याची इच्छा वाढते. चयापचयाचा दर कमी असेल तर वजन कमी करणं अवघड जातं. अगदी व्यायाम करत असाल तरीही वजन कमी होत नाही. त्यामुळं वजन कमी करायचं असेल तर ताणतणावाचं व्यवस्थापन करणं आणि आवश्यक ती झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

व्यायाम करणं सर्वांत महत्त्वाचं

आजकाल शारीरिक कष्टांची कामे कमी झाली आहेत. अनेक लोक दिवसभर एका ठिकाणी खुर्चीत बसून काम करतात. त्यामुळे दिवसभर शरीराची फार हालचाल होत नाही. अनेकदा वेळेअभावी व्यायामही (Exercise) केला जात नाही. त्यामुळं शरीरातील कॅलरीज जाळल्या जात नाहीत. परिणामी चरबीचे थर आणि वजनही वाढत जाते. त्यामुळं दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे. यामुळं केवळ वजनच कमी होणार नाही तर पोटावरची चरबीही कमी होईल, आणि तुमचं शरीर तंदुरुस्त राहील. त्यामुळं दररोज व्यायाम करा आणि जास्तीत जास्त कॅलरीज जाळून वजन कमी करा.



मान्सूनची महाराष्ट्राकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता

तेव्हा तुम्हाला फिट रहायचं असेल तर वजन कमी करणं आवश्यक आहे. त्यासाठी दररोज व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव दूर ठेवणं, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं आणि दारू पिणं टाळणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या गोष्टींचा आयुष्यात समावेश करा आणि पाहा काय जादू होते ती.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *