महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केलं चिकन; मात्र पार्सल उघडून बघताच बसला धक्का, शेअर केला VIDEO

महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केलं चिकन; मात्र पार्सल उघडून बघताच बसला धक्का, शेअर केला VIDEO
 ऑनलाईन जेवण ऑर्डर (Online Food Delivery) करणं हा आता लोकांच्या आयुष्याचा एक भागच बनला आहे. कोणत्याही कारणानं जेवण बनवायचं राहिल्यास बऱ्याच व्यक्ती थेट फूड अॅप्सच्या (Food App) माध्यमातूनच जेवण ऑर्डर
Advertisement
(online food order) करतात. मात्र, काही वेळा असंही होतं, की आपण ऑर्डर काहीतरी वेगळंच करतो आणि आपल्यापर्यंत पोहोचतं काही वेगळंच. अशीच एक घटना समोर आली आहे. विचार करा, की तुम्ही फ्राइड चिकन ऑर्डर केलं आहे मात्र त्याजागी तुम्हाला टॉवेल तेलात फ्राय करुन दिला गेला. खरंतर अशी एक घटना फिलीपिन्समधील एका महिलेसोबत घडली आहे.या महिलेनं तिच्या मुलाला भूक लागल्यानं ऑनलाईन चिकन मागवण्याचा प्लॅन केला आणि फूड अॅपच्या माध्यमातून चिकन ऑर्डर केलं. डिलीवरी बॉय ऑर्डर घेऊन घरी आला आणि महिलेच्या कुटुंबीयांनी हे पार्सल उघडून पाहिलं, तेव्हा ते सगळेच हैराण झाले. त्यांना चिकनच्या जागी फ्राईड टॉवेल दिला गेला होता. महिलेला याबाबत तेव्हा समजलं, जेव्हा हे चिकन खाण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते दातानं तोडण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले.
या महिलेचं नाव Alique Perez असं आहे. तिनं फेसबुकच्या माध्यमातून ही संपूर्ण घटना सांगितली असून लोकांना अशा प्रकारच्या ऑर्डरपासून (online food order) सावधान राहाण्याचा इशारा दिला आहे. या महिलेनं व्हिडिओ आणि काही फोटोही शेअर केले आहेत. पोस्टमध्ये तिनं सांगितलं, की तिनं आपल्या मुलासाठी फ्राइड चिकन (Online Food Delivery)  मागवलं होतं. मात्र, याजागी फ्राइड टॉवेल पाठवण्यात आला. हे खाण्याचा प्रयत्न करत असताना लक्षात आलं, की हे चिकन नसून भलतंच काहीतरी आहे. लोकांनी महिलेच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत संबंधित फूड कंपनीवर टीका करत हे घातक असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *