ICCकडून भारताला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

ICCकडून भारताला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

देशातील करोना परिस्थितीमुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC)कडून या वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप अन्य ठिकाणी आयोजित करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. हा वर्ल्डकप भारतात व्हावा यासाठी बीसीसीआयकडून देखील जोरदार प्रयत्न सुरू (sports news) आहेत.बीसीसीआयने २९ मे रोजी झालेल्या बैठकीत आयपीएलच्या उर्वरीत ३१ लढती युएईमध्ये खेळवण्याची घोषणा केली. यामुळे आयसीसीकडे टी-२० वर्ल्डकपसाठी भारत हाच एकमेव पर्याय राहिल्याचे बोलले जात होते. पण आता आयसीसीकडून ऑक्टोबर-नोब्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपबाबत वेगळा विचार सुरू असल्याचे समोर येत आहे.आयसीसी टी-२० वर्ल्डकप युएई आणि ओमान अशा दोन देशात मिळून करण्याचा विचार करत आहे.

आयसीसीमधील आंतर्गत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भारतातील करोना परिस्थीतमुळे आयसीसीकडून हा निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्ल्डकपसाठी दुसरा पर्याय म्हणून युएईकडे पाहिले जात होते. आता या पर्यायामध्ये ओमानची राजधानी मस्कतचा देखील समावेश चौथे स्टेडियम म्हणून करण्यात आलाय. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी दुबई, शारजाहा, अबुधाबी सह मस्कतचा विचार केला जात आहे.
एक जून रोजी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने वर्ल्डकप संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी एका महिन्याची मुदत मागितली होती. आयसीसीमधील सूत्रांच्या मते भारताकडेच यजमानपदाचे अधिकार असतील. पण ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये खेळवली (sports news) जाईल.

टी-२० वर्ल्डकपमधील पहिल्या फेरीतील लढती मस्कत येथे खेळवल्या जाऊ शकतात. जेणे करून आयपीएलच्या ३१ लढतीनंतर युएईमधील मैदाने वर्ल्डकपमधील लढती खेळवण्यासाठी तयार होतील. आयपीएलमधील अंतिम लढत १० ऑक्टोबर रोजी झाली तर वर्ल्डकपच्या युएईमधील लढती ऑक्टोबर महिन्यात सुरू होतील. यामुळे खेळपट्टी तयार करण्यास तीन आठवड्यांचा वेळ मिळेल.

आयसीसी बोर्डामधील जवळपास सर्व सदस्यांना असे वाटते की बीसीसीआयकडून वेळ काढण्याचे काम सुरू आहे. कारण त्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतातील परिस्थिती कशी असेल हे सांगणे कठीण आहे. सध्या भारतात १ लाख २० हजार रुग्ण आढळत आहेत. २८ जून रोजी होणाऱ्या बैठकीत स्पर्धा भारतात होण्याचा निर्णय जरी झाला तरी ऑक्टोबरमधील देशातील परिस्थती कशी असेल आताच सांगणे शक्य नाही. याच काळात देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे एका सदस्याने सांगितले.


टी-२० वर्ल्डकपमध्ये १६ संघ असणार आहे. बायो बबलमधील एका खेळाडूला जरी करोनाची लागण झाली तर ती परिस्थीती आयपीएल सारखी असणार नाही. आंतरराष्ट्रीय संघाकडे एकाच वेळी १४-१५ बदली खेळाडू असणार नाहीत.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *