‘IPL’चे उर्वरित सामने ‘या’ तारखेपासून होणार सुरू

‘IPL’चे उर्वरित सामने ‘या’ तारखेपासून होणार सुरू

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल (ipl) २०२१ च्या उर्वरित सामन्यांच्या तारखांची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा (टप्पा २) १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे.२०२१ च्या १५ ऑक्टोबर ला दसरा हा सण आहे. बीसीसीआय आणि अमीरात क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीच्या घडामोडींविषयी माहिती असलेल्या बीसीसीआयच्या अधिका्याने एएनाअय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. उर्वरित आयपीएलचे सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे यशस्वीरीत्या पार पडतील असा विश्वासही त्या बीसीसीआय अधिका-याने व्यक्त केला आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल (ipl) संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने हा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला. त्यानंतर २९ मे रोजी बीसीसीआयच्या झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित आयपीएलचा हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एएनआयबरोबर बोलताना बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की ‘अमिराती क्रिकेट बोर्डासह चांगली चर्चा झाली. त्यांनी बीसीसीआयच्या बैठकीपूर्वीच स्पर्धेच्या आयोजनासाठी शाब्दिक सहमती दर्शवली होती. हा हंगाम १९ सप्टेंबरला सुरु होईल आणि १५ ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल.

उर्वरित हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होईल व अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. म्हणजे २५ दिवसांच्या कालावधीत उर्वरित ३१ सामने होणार आहेत.उर्वरित हंगामात परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबद्दल मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल चर्चा सुरु आहे. तसेच त्यांना आशा आहे की जास्तीतजास्त परदेशी खेळाडू या उर्वरित हंगामासाठी उपलब्ध असतील. दरम्यान यापूर्वीच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले होते की जरी काही परदेशी खेळाडू उपलब्ध राहिले नाही, तरी स्पर्धा पूर्ण खेळवली जाईल.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *