ट्रोल झाल्यानंतर सौरव गांगुलीनं ‘ती’ पोस्ट हटवली

ट्रोल झाल्यानंतर सौरव गांगुलीनं ‘ती’ पोस्ट हटवली

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या आयपीएल २०२१च्या दुसर्‍या टप्प्यातील तयारीचा आढावा घेण्यासाठी दुबईमध्ये पोहोचला आहे. तिथे गेल्यानंतर गांगुलीने (troll on internet) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, लोकांनी या पोस्टवर तोंडसुख घेतल्यानंतर गांगुलीला ही पोस्ट काढून टाकावी लागली आहे.दुबईला पोहोचल्यानंतर गांगुली आपल्या प्रत्येक कामाचा आढावा लोकांना देत आहे. शिवाय तो कामासोबत इतर गोष्टींचा आनंद घेतानाही दिसून आला. गांगुलीने दुबईला गेल्यानंतर रेसिंग कारचा अनुभव घेतला. इतकेच नव्हे, तर त्याने या अनुभवाबद्दल माहिती देताना एक फोटोही पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी तोंडसुख घेतले. हे करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी कर, असेही काहीजणांनी गांगुलीला सांगितले. लोकांनी ट्रोल (troll on internet) केल्याचे पाहून गांगुलीने ही पोस्ट काढून टाकली.

गांगुलीने काढून टाकलेली पोस्ट

बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) खेळवण्याचा घाट घातला आहे. मात्र सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या उर्वरित बहुतेक परदेशी खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू अमिरातीत दाखल झाले नाहीत तर त्यांच्या पगारात कपात केली जाईल, असा इशारा फ्रेंचायझींनी दिला आहे.पॅट कमिन्स आयपीएलबाहेर

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या उर्वरित हंगामात न खेळण्याचे म्हटले आहे. सध्याच्या मोसमात कोलकाता संघाला चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे हा संघाला दुहेरी धक्का मानला जाऊ शकतो. संघाने यंदा ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *