इचलकरंजीत वाढती रुग्ण संख्या चिंताजनक…

इचलकरंजीत वाढती रुग्ण संख्या चिंताजनक…

सोमवारी प्राप्त अहवालात शहरातील विविध २९ भागातील ४१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल (antigen test) पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये ४ बालकांचा समावेश आहे. ही बालके ८ ते १० वयोगटातील असून आता पालकांनी खबरदारी घेणे अतिशय गरजेचे आहे.तर दोघा बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या ७ हजार १०३ झाली असून सध्या ४८६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांची संख्या ३५८ वर पोहचली आहे.विविध उपाययोजना करूनही कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव थांबता थांबेनासा झाला आहे. गत चोवीस तासात प्राप्त अहवालात (antigen test) नव्याने ४१ रुग्णांची भर पडली आहे.त्यामध्ये श्रीपादनगर परिसरात ४, सांगली नाका, इंडस्ट्रीयल इस्टेट व यशवंत कॉलनी परिसरात प्रत्येकी ३, महासत्ता चौक, आसरानगर, विक्रमनगर परिसरात प्रत्येकी २ तर शेळके मळा, नदीवेस नाका, मोठे तळे, बोहरा मार्केट, लायकर गल्ली, झेंडा चौक, अष्टविनायक गल्ली, खंजिरे मळा, मंगळवार पेठ, लालनगर, नारायणनगर, कुष्ठरोग वसाहत, राधाकृष्ण कॉलनी, तांबेमाळ, बंडगरमाळ, लायकर गल्ली, विवेकानंद कॉलनी, श्रध्दा कॉलनी, गांधी हॉस्पिटलजवळ, जवाहरनगर, दत्तनगर व शहापूर परिसरात प्रत्येकी एक अशा ४१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.तर गणेशनगरमधील ५३ वर्षीय पुरुष आणि लिगाडे मळा परिसरातील ४६ वर्षीय महिला अशा दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *