“…तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुन्हा दाखल करावा”

“…तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुन्हा दाखल करावा”

पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघातील टँकर सेवा आणि इतर बाबींवर तोंडी वाफा घालवू नये. त्यामध्ये तथ्य असेल तर थेट गुन्हा दाखल करावा, असे प्रत्युत्तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी (local politics news) दिले.गोकुळमध्ये व्यंकटेश्‍वरा कंपनीने मागील दहा वर्षांत 134 कोटी रुपये मिळवले असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या पार्श्‍वभूमीवर शौमिका महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले.

पत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात, संघात आजपर्यंत हुकूमशाही कारभार होता. जर खरेच हुकूमशाही कारभार असता तर पहिल्याच दिवशी त्यांना बिलाचा लेखाजोखा मिळाला असता का? आज तो कागद, सर्व बिलांची माहिती या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. कारण आम्हाला कधीच या गोष्टी लपवण्याची गरज पडली नाही. जे आहे ते समोर आहे, स्पष्ट आहे, पारदर्शी आहे.

सेवा दिली, बिलं घेतली. व्यवसाय व्यवसायाच्या जागीच ठेवला. हुकूमशाही कारभार म्हणजे काय असतो हे बघायचंच असेल तर त्यांनी पालकमंत्र्यांच्या ताब्यातील गगनबावड्याचा साखर कारखान्यात डोकावून बघावे. ज्याचा अहवाल कधी समोर येत नाही, रातोरात कारखान्याचं नाव बदललं जातं आणि निवडणुका तर कधी येऊन जातात हे कळतसुद्धा (local politics news) नाही.महाडिकांनी सेवा देऊन बिलं घेतली. यात जर काही खोटं असेल, भ—ष्टाचार असेल तर ते गृहराज्यमंत्री आहेत. रोज उठून मीडियासमोर बोलण्यापेक्षा थेट कंपनीवर गुन्हा दाखल करावा. विद्यमान चेअरमन विश्‍वास पाटील यांनी या प्रकरणात काय भ—ष्टाचार आहे? अजून कोणाचे किती टँकर आहेत? याचा खुलासा करावा. शेतकर्‍यांना दोन रुपये वाढवून देण्यासाठी नियोजन तयार होतं तर आता उशीर का लागतोय हे स्पष्ट करावे, असेही पत्रकात म्हटले आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *