मीरा राजपूतनं शेअर केला शाहिद कपूरचा खास व्हिडीओ, कॅप्शनमध्ये लिहिलं…

मीरा राजपूतनं शेअर केला शाहिद कपूरचा खास व्हिडीओ, कॅप्शनमध्ये लिहिलं…

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूतची (Mira Rajput) जोडी चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरते. 2015 मध्ये मीरा आणि शाहिदनं लग्नगाठ बांधली होती. हे सुंदर जोडपं आता सोशल मीडियाच्या (video on social media) माध्यमातून एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करत आहे. अशा परिस्थितीत नुकतंच मीरा राजपूतनं तिच्या नवऱ्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


मीरा राजपूत सिनेमा जगतातली नसली तरी तिची फॅन फॉलोव्हिंग बड्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. मीरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अशा परिस्थितीत आता मीरानं चाहत्यांसाठी पती शाहिदचा व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओसोबतच तिनं एक खास कॅप्शन देखील लिहिलं आहे.

मीरानं शाहिदचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर (instagram story) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहिदच्या वेगळ्या लूकची झलक दिसून येतेय. व्हिडीओमध्ये (video on social media)  त्याचे फोटो, कॅटवॉक, मुलाखती हे सगळं एकत्र दिसत आहे.


हा खास व्हिडीओ शेअर करताना मीरानं लिहिलेल्या कॅप्शनवर सर्वांचं लक्ष लागलं आहे, मीराने तिच्या पतीच्या या व्हिडीओवर आजचा गोड पदार्थ अर्थात (Dessert Tonight) असं लिहिलेलं आहे. मीराचं हे कॅप्शन चाहत्यांच्या समजण्यापलीकडे आहे. काही चाहते त्यावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काहींना त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहिद कपूर कबीर सिंगनंतर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. आता शाहिद लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात झळकणार आहे. कबीर सिंगप्रमाणेच हा देखील साऊथ चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत पंकज कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


दिवाळीनिमित्त हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त ओटीटीमधून अभिनेत्याच्या पदार्पणाची चर्चाही समोर येत आहे.शाहिद आणि मीराला मिशा आणि झेन अशी दोन मुले आहेत. मीरा तिच्या मुलांबरोबरच वेळ घालवायला आवडते. मीरा अनेकदा सोशल मीडियावर फिटनेस संबंधित व्हिडीओ शेअर करत असते, त्याचबरोबर मीरा तिच्या फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. मीरा राजपूतचे इंस्टाग्रामवर 2.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *