राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

मान्सून राज्यात सक्रीय झाला आहे. अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसासह अतिवृष्टी  होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (Weather Alert ) दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज मान्सूनचे आगमन झाले. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस (Mumbai Rain) झाल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. कोकणातही मुसळधार पावसासह ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मुंबईची दाणादाण, मुंबईकरांचे असे हाल

तर दुसरीकडे कोकणात  ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (Weather Alert ) अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार पाऊस कोसळत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस ढगफुटीप्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे.

सोन्याचांदीच्या दरात तेजी, तपासा लेटेस्ट भाव

कोकणात ढगफुटीचा इशारा

पहिल्याच पावसाने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. चेंबूर परिसरात देखील पावसाचा जोर दिसून येत आहे. चेंबूरमध्ये पावसामुळे नागिरकांना वाहतुकीला त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी प्रशानसाकडून आश्वसन देऊनही काम योग्यरित्या होत नसल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, कांदिवली, अंधेरी, मालाड, जोगेश्वरी भागात अधून मधून सतत पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे काही सखल भागात पाणी जमा होण्यासाठी देखील सुरू झाले आहे. मुंबईच्या गांधी मार्केट भागातही काही सखल भागात पाणी साचले आहे. अनलॉकमुळे कार्यालय 40 टक्के उपस्थितीने सुरु झाल्यामुळे ऑफीस गाठण्यासाठी नागरिक पाण्यातून कसरत कसरत करावी लागत आहे. तर खासगी वाहनांनाही धिम्यागतीने पाण्यातून गाड्या काढव्या लागत आहेत.मुंबईत गडगडाटासह जोरदार पाऊस

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मात्र अद्याप कुठेही पाणी साचल्याची घटना समोर आली नाही हवेत गारवा निर्माण झाल्याने काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सर्व यंत्रणां सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस सुरु होता. पावसामुळे कल्याण पूर्वेत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नसून भिंतीमुळे रस्ताही खचला आहे.वसई-विरारमध्ये काल रात्रीपासून रिमझिम पाऊस बरसतोय. पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झालेले पाहायला मिळाले. विरार,नालासोपारा आणि वसई शहरातील काही सखल रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सकाळीच कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना त्यातून वाट काढणे कसरतीचे झाले.

Syska ची स्वस्त स्मार्टवॉच भारतात लाँच

परभणी जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला…ग्रामीण भागासह शहरांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओढे पहिल्यांदा वाहू लागलेत. सखल भागात पाणी साचलं तर रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी वाहत होतं. पावसाबरोबर वादळी वारे वाहत असल्याने अनेक गावांची बत्ती रात्रीपासून गुल झाली परभणी शहरातही अनेक भागातली लाईट अद्याप आलेली नाही. रात्री 115 मिली मिटर पाऊस झाल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने केली आहे.Omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *