कोल्हापूरात कोरोनासोबत म्युकरमायकोसिसचा ही धोका वाढला

कोल्हापूरात कोरोनासोबत म्युकरमायकोसिसचा ही धोका वाढला

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात (kolhapur district) म्युकरमायकोसिसचे रुग्‍ण वाढत चालले असून, आतापर्यंत ११५ रुग्‍ण या आजाराने बाधित (mucer mycosis) आहेत. यातील ९५ रुग्‍णांवर उपचार सुरू असून, ७ रुग्‍णांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसने (fungal infection) बाधित रुग्‍णांत पुरुषांची संख्या सर्वाधिक म्‍हणजे ८८ तर स्‍त्रियांची संख्या २७ आहे. बाधित रुग्‍णांपैकी ५३ रुग्‍णांना मधुमेहाचा (diabetes) आजार आहे. म्‍हणजे जवळपास ५० टक्‍के रुग्‍ण मधुमेहाने बाधित आहेत.सध्या सीपीआरमध्ये मोठ्या प्रमाणात अशा रुग्‍णांवर उपचार सुरू असले तरी ही यंत्रणाही कमी पडत असून, वाढणारी रुग्‍णसंख्या ध्यानात घेऊन प्रशासनाला उपचारासाठी आणखी आरोग्य व्यवस्‍था वाढवावी लागणार आहे. कोरोनाचे रुग्‍ण (covid-19 patients) वाढत असतानाच म्युकरमायकोसिसची भर पडली आहे. केंद्र शासनाने central government) तर या आजाराचा समावेश साथीच्या रोगांत करण्याचे आदेश दिले आहेत.

बहुतांश कोविड बरा झालेल्या रुग्‍णांत म्युकरमायकोसिसचा आजार आढळून येत आहे. कोरोना बरे झालेल्या रुग्‍णांमधील काही रुग्‍णांना डोळे आणि नाकाचे इन्‍फेक्‍शन झाल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्‍ह्यात ११५ रुग्‍णांना या बुरशीचा आजार झाला आहे.ज्या रुग्‍णांची प्रतिकारशक्‍ती (immunity power) कमी आहे, अशा रुग्णांत काळ्या बुरशीचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे कमी झालेली रोगप्रतिकारक शक्‍ती, कोविडच्या रुग्‍णांना दिले जाणारे स्‍टेरॉईड्‌स आणि इतर औषधे यामुळेच काळ्या बुरशीचा आजार वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. काळ्या बुरशीच्या ११५ रुग्‍णांपैकी ५३ रुग्‍ण मधुमेहाचे आहेत.

त्‍यातही तोंड, नाक, डोळ्यांतील बुरशीचे (fungal infection) रुग्‍ण ५० पेक्षा अधिक आहेत, तर ६२ रुग्ण काळ्या बुरशीची बाधा शरीराच्या विविध भागांत झाल्याचे आढळून आले. जिल्‍ह्यातील २१ हॉस्पिटलमध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५० टक्‍के रुग्‍ण हे एकट्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या आजाराने जे काही मृत्‍यू झाले आहेत, ते सर्व खासगी रुग्‍णालयात झाले आहेत.


म्युकरमायकोसिस रुग्णांची स्थिती

म्युकरमायकोसिसचे रुग्‍ण – 115

  • पुरुष – 88
  • स्‍त्री – 27
  • उपचार घेणारे – 95
  • बरे झालेले – 14
  • मृत्‍यू – 7
  • १८ ते ४५ वयोगटातील रुग्‍ण – 25
  • ४५ ते ६० वयोगटातील रुग्‍ण – 61
  • कोविड बाधित रुग्‍ण – 111
  • नॉन कोविड रुग्‍ण – 4

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *