भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार करून काढले…

भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार करून काढले…

अनेक कायदे, कठोर शिक्षा देऊनही समाजातील बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. अशीच एक बलात्काराची धक्कादायक घटना रांची येथे घडली आहे. इथे काही नराधमांनी क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या. राज्यातील पलामू जिल्ह्यातील भाजपाच्या स्थानिक नेत्याच्या १६ वर्षीय मुलीवर अत्याचार (crime news today) करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.नराधमांनी या मुलीवर आधी बलात्कार केला. त्यानंतर तिचे डोळे काढले. अखेरीस ही आत्महत्या भासावी म्हणून तिचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत लटकवला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई प्रदीप कुमार सिंह नावाच्या आरोपील अटक केली आहे. (Jharkhand Crime News)ही घटना ७ जून रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलगी सकाळी १० वाजता घराबाहेर गेली होती. ती परत आली नाही त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर पांकी येथील पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. मग पोलिसांनीही तपासास सुरुवात केली.

मुलीला शोधून काढण्यासाठी शोधमोहीम सुरू असतानाच बुधवारी पोलिसांना लालीमाटी जंगलामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह मिळाला. मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या चार मुली आणि एक मुलगा आहे. पैकी मोठ्या मुलीची या नराघमांनी हत्या केली.

या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या पोलिसांना घटनास्थळावर एक मोबाईल सापडला. त्या आधारावर पोलिसांनी प्रदीप नावाच्या आरोपीला अटक केली आहे. पांकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्यासंदर्भात तक्रार (crime news today) दिली होती. पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला होता.त्यानंतर जंगलातून या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तिची हत्या करून नंतर ही आत्महत्या असल्याचे भासवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. आता पोस्टमार्टेमच्या अहवालातून याबाबत अधिक माहिती समोर येईल. दरम्यान, आपल्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आले, असा आरोप पीडितेच्या पित्याकडून करण्यात येत आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *