मिका सिंगसाठी, तो एक KISS पडला होता भारी

मिका सिंगसाठी, तो एक KISS पडला होता भारी

मिका सिंग (Mika Singh) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो. ‘मोज्जा ही मोज्जा’ या गाण्यामुळं लोकप्रिय झालेल्या मिकानं आपल्या अनोख्या आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान प्रस्थापित केले (entertainment center) आहे. आज मिकाचा वाढदिवस आहे. (Mika Singh birthday) 44व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.मिका हा गाण्यांसोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण राखी सावंतमुळं त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ देखील आली होती. (Mika Singh Forcefully Kissed Rakhi Sawant) पाहुया काय होता तो किस्सा…

 

 

2006 साली मिकानं राखीला आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावलं होतं. या पार्टीत डान्स करत असताना त्यानं राखीला जबरदस्तीनं किस केलं. या प्रकारामुळं सर्वच जण चकित झाले होते. जबरदस्तीनं घेतलेल्या या चुंबनामुळं राखी संतापली अन् तिनं मिका विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी त्याला अटक केली. वाढदिवसानंतर पुढील काही दिवस मिकाला तुरुंगातच घालवावे लागले होते.
मात्र काही दिवसानंतर पुढे या केसचं काहीच झालं नाही. कारण राखीनं स्वत:च केस मागे घेतली. त्यामुळं दोघांनी केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून हा प्रकार केला असावा अशी चर्चा सुरु झाली. या चुंबनाचे फोटो आणि व्हिडीओ देखील त्यावेळी वृत्तमाध्यमांद्वारे व्हायरल  (viral video) झाले होते. आज मिक्काच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे.

ही घटना जुनी असली तरी सोशल मीडियावर बऱ्याचदा यावर चर्चा सुरु असते. मात्र, आता असे दिसते की हे दोघेही त्या घटनेला विसरुन पुढे निघाले आहेत. आता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिका आणि राखी मिठी मारताना दिसतं (entertainment center) आहेत.


एवढंच नाही तर त्या दोघांनी एकमेकांची स्तुती केली. जेव्हा राखीने मिकाला तिच्याकडे येताना पाहिलं तेव्हा ती सिंग इज किंग, सिंग इज किंग बोलतं होती. तर, मिका म्हणाला की, “इथून जात असताना राखीला पाहिल्यानंतर तो दुर्लक्ष करु शकत नाही आणि बिग बॉस हे फक्त राखीमुळे लोकप्रिय झालं.”

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *