बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील’, चक्क नऊवारी साडीत धम्माल डान्स

बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील’, चक्क नऊवारी साडीत धम्माल डान्स

कोणत्याही गोष्टीला वयाचं बंधन नसत असं म्हटलं जातं, ही गोष्ट अभिनेत्री (Marathi Actress)  किशोरी शहाणे(Kishori Shahane)  यांना तंतोतंत लागू होते.  आजही त्यांच्यामध्ये एखाद्या नवख्या अभिनेत्री इतकाच उत्साह पाहायला मिळतो. त्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीचा मनमुराद आनंद घेत असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतं आहे, त्यामध्ये त्या चक्क नऊवारीमध्ये ‘गोरे गोरे गालों पे है’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत.मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणे यांना ओळखल जातं. मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. इतकचं नव्हे तर त्यांनी अनेक उत्मम मालिकांमध्ये काम केल आहे. आजही त्या मनोरंजन क्षेत्रात तितक्याच सक्रीय आहेत. 

या तरुणीचा ‘तांडव’ ठरला सोशल मीडिया Sensation; 15 लाख वेळा पाहिला गेला VIDEO

नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये किशोरी शहाणे चक्क नऊवारी साडीमध्ये ‘गोरे गोरे गालों पे है काला काला तील’ या गाण्यावर धम्माल डान्स (Viral Video) करताना दिसत आहेत. त्यांचा उत्साह पाहून चाहतेही त्यांच्यावर फिदा झाले आहेत. आजही त्यांच्यामध्ये तशीच एनर्जी दिसून येते. राखाडी रंगाची नऊवारी साडी आणि गळ्यात पांढऱ्या मोत्यांची माळ यामध्ये त्या खुपचं सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्स तर करतचं आहेत, शिवाय भरभरून कमेंट्सही करत आहेत.


मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खरीप हंगामासाठी MSP मध्ये घसघशीत वाढ

किशोरी शहाणे अलीकडेच बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा त्यांना प्रचंड पसंती मिळाली होती. त्या सर्व नवोदित कलाकारांनां बरोबरीने टक्कर देत होत्या. त्यामुळे त्या बिग बॉसच्या घरामध्येसुद्धा सर्वांनाच अवाक् करत होत्या. आणि त्यामुळेच त्यांनी बिग बॉसच्या फायनलमध्ये स्थान मिळवलं होतं. बिग बॉसनंतर त्या एका हिंदी वेबसिरीजमध्येही झळकल्या होत्या.

 

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *