“….शेतकऱ्यांची फसवणूक केली” राजू शेट्टी यांचा आरोप

“….शेतकऱ्यांची फसवणूक केली” राजू शेट्टी यांचा आरोप

मोदी सरकारने जाहीर (central government) केलेला हमीभाव हा जुमला असल्याची टीका स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांनी पत्रकारांशी बोलताना केली. केंद्राने यंदाच्या खरीप हंगामासाठी किमान समर्थन मूल्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने हे मूल्यवाढवताना शेतकऱ्यांची (farmers) फसवणूक केली असल्याचा आरोप शेट्टी यांनी  (local politics news) केला.एका बाजूला मशागतीचा वाढलेला खर्च बियाणांच्या वाढलेल्या किमती आणि केंद्र सरकारने वाढलेला हमीभाव याचा विचार केला, तर कशाचा कशाला मेळ लागत नसल्याचे दिसते. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे.आम्ही भीक मागत नाही, आम्ही कायदेशीर हमीभाव मागतोय. सरकार दावा करतोय की आम्ही साठ टक्के हमी भाव वाढवला, कुठल्याही तज्ञाने सरकारच्या एखाद्या संशोधन केंद्रांमध्ये साठ टक्के हमीभाव कसा वाढला आणि उत्पादन खर्च किती झाला हे सिद्ध करून दाखवावं, असे निर्दशनास आले तर आम्ही पुन्हा हमीभाव मागणार नाही असे शेट्टी यांनी यावेळी (local politics news) सांगितले.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *