मिथुनच्या सुनेची स्पा पार्लरमध्ये धमाल…

मिथुनच्या सुनेची स्पा पार्लरमध्ये धमाल…

मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सध्या अनुपमा या मालिकेत आपल्या धमाकेदार अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकतेय. ही तिची पहिलीच मालिका आहे आणि पहिल्याच मालिकेतून तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. मदालसा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या (photo on social media) माध्यमातून कनेक्ट होते.कमी वेळात तिनं स्वत:ची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिनं स्पा पार्लरमधून काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर (photo on social media) केले आहेत.तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये नंदू म्हणजेच अनघा भोसले मदालसाबरोबर आहे. दोघी बाथरोबमध्ये दिसल्या आहेत. दोघांच्याही डोक्यावर गुलाबाचे फूल आहे.

याआधीही या दोघींचा डान्स व्हिडीओ चर्चेत होता, यात दोघीही ‘पिया पिया’ या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत होते. या व्हिडीओला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये ती काव्याची भूमिका साकारत आहे.


 

काव्या ही सुशिक्षित, स्वतंत्र आणि आधुनिक मुलगी आहे. शोमधील काव्याची व्यक्तिरेखा आत्मविश्वासपूर्ण आहे. मदालसा ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शीला शर्मा आणि दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. गणेश आचार्य निर्मित ‘एंजेल’ चित्रपटात मादासानं बॉलिवूडमध्ये काम केले आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *