मोदी सरकारही TikTok वरील बंदी उठवणार ?

मोदी सरकारही TikTok वरील बंदी उठवणार ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये टिकटॉक (tiktok app)  आणि वीचॅटवर घातलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील अध्यादेशावर बायडन यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) स्वाक्षरी केली. तसेच त्यांनी चीनबरोबरच इतर राष्ट्रांकडून होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांसंदर्भातही एक आदेश जारी केला आहे. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान आणि संवाद यंत्रणेसंदर्भातील सुरक्षेचा आदेश बायडन यांनी पारित केलाय.“आज राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी एक्झीक्युटीव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. १५ मे २०१९ रोजी (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भातील) राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान जारी करण्यात आलेले आदेशांमध्ये बदल करुन अमेरिकन माहिती आणि तंत्रज्ञान तसेच सेवा पुरवठा यंत्रणेच्या सुरक्षा अधिक सक्षम करण्याचा निर्णय नवीन आदेशांनुसार घेण्यात येत आहे,” असं म्हटलं आहे. या आदेशामुळे अमेरिकेतील डिजीटल माहिती अधिक सुरक्षित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.“राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी टिकटॉक (tiktok app) आणि वीचॅटवर बंदी घालणारे आदेश रद्द केले आहेत. त्याचप्रमाणे इतर आठ संवाद तसेच आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भातील सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्सवरील बंदीही ठवण्यात आलीय,” असंही या आदेशात म्हटलं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्यासंदर्भात २०२० साली आदेश जारी करत अमेरिकन अ‍ॅप स्टोअर्सवरुन काही अ‍ॅप काढून टाकण्याचे आदेश जारी केलेले. तसेच अमेरिकेमध्ये या कंपन्यांना व्यवसाय करु न देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला.भारतही चिनी अ‍ॅप्सवरील बंदी उठवणार का?

अमेरिकेने टिकटॉकवरील बंदी उठवल्यानंतर भारतसुद्धा चिनी अ‍ॅप्सवर टाकलेली बंदी उठवणार का यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. गलवान खोऱ्यामध्ये मागील वर्षी झालेल्या भारत-चीनदरम्यानच्या रक्तरंजीत संघर्षानंतर भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, वीचॅट, पबजी, कॅमस्कॅनसारख्या अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होता.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *