बॉलिवूड गाण्यांवर रोमान्स करणं पोलिसांना पडलं भारी

बॉलिवूड गाण्यांवर रोमान्स करणं पोलिसांना पडलं भारी

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं सध्या संपूर्ण देश त्रस्त आहे. (Coronavirus) कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. मात्र यामुळं पोलिसांचा मनस्ताप मात्र कमालिचा वाढला आहे. कोरोनाशी दोन हात करत दिवस-रात्र पोलिसांना पोट्रोलिंग करावं लागत आहे. सर्वसामान्य माणूस घरात बसला (viral video) आहे.मात्र दुसरीकडे पोलिसांना आपल्या सुट्ट्या रद्द करुन जनतेच्या रक्षणासाठी आधिक वेळ काम करावं लागत आहे. (Delhi Police) अशा त्रस्त वातावरणात चार विरंगुळ्याचे क्षण म्हणून एका पोलीस जोडप्यानं बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्यास सुरुवात केली. (Dance on bollywood song) त्यांचे हे रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (viral video) सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.हे पोलीस जोडपं दिल्लीतील आहे. त्यांनी लॉकडाउन ड्युटिवर असतानाच पोलिसांच्या गणवेशात बॉलिवूड गाण्यांवर डान्स डान्स केला. हे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले. हे व्हिडीओ पाहून काही जणांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र काहींनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या व्हिडीओची नोंद आता दिल्ली पोलीस प्रशासनानं देखील घेतली आहे.

DCP उशा रंगानी यांनी त्यांना अधिकृत नोटिस बजावलं आहे. असे ऑनड्युटीवर असताना असे व्हिडीओ शूट करण्यामागणं कारण त्यांना यामध्ये विचारलं गेलं आहे. शिवाय त्यांना काही दिवसांसाठी सस्पेंड देखील करण्यात आलं आहे.लॉकडाउनमुळं सर्वांनाच सक्तीनं घरात बसावं लागत आहे. व ज्यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांचे फटके देखील बसले आहेत. एकतर बेरोजगारी व दुसरीकडे पोलिसांचे फटके यामुळं देखील अनेक जण पोलिसांवर नाराज आहेत. त्यामुळं अनेकांनी पोलिसांच्या या व्हिडीओवर टिकेचा वर्षाव केला.

अन् त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. मात्र काही नेटकऱ्यांनी या कारवाईला विरोध देखील केला आहे. त्यांनी पोलिसांच्या सद्य परिस्थिचीचं वर्णन करुन त्यांच्या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. सध्या नेटकरी देखील या व्हिडीओमुळं दोन भागांत विभागले गेल्याचं दिसत आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *