‘आता माझी सटकली’; सनी लियोनीचा हा जबरदस्त VIDEO होतोय VIRAL

‘आता माझी सटकली’; सनी लियोनीचा हा जबरदस्त VIDEO होतोय VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) आपलं सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी लाखो फॅन्सना घायाळ करत आहे. त्यातही तिच्यावर चित्रित झालेली गाणी लक्षवेधी ठरतात. प्रत्येक गाण्यामधील तिची अदा, बोल्डनेस, डान्स स्टेप्सची केमिस्ट्री फॅन्सला आकर्षित करते. त्यामुळे चित्रपट असो शो असो किंवा सोशल मिडीया (Social Media) तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत  (viral on social media)असते.

सनी लियोनीने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गमतीशीर असून, या व्हिडीओत ती चित्रपटाचं शुटिंग करताना दिसत आहे. या शुटिंगदरम्यान ती हवेत तरंगताना दिसत आहे. सनीचा हा स्टंट पाहून फॅन्स आश्चर्यचकीत झाले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टची कॅप्शन (Caption) विशेष आकर्षण ठरत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये सनीने `आता माझी सटकली` असं लिहीलं आहे. यावर तिच्या फॅन्सने जोरदार कमेंटस केल्या आहेत.यापूर्वी सनी लियोनीने तिचा एक डान्सिंग (Dancing) व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती विचित्र पध्दतीने डान्स स्टेप्स करताना (Dance Steps) दिसली. सनीच्या या डान्स स्टेप्सला फॅन्सकडून विशेष पसंती मिळाली होती, आणि या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला होता.  नुकताच सनीने आपला 40 वा वाढदिवस साजरा केला.

तिने जिस्म 2 या चित्रपटाव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. त्यानंतर रागिनी एमएमएस 2 यासारख्या चित्रपटांमधून तिने अभिनय केला होता. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या रईस या चित्रपटातील `लैला` या गाण्यात तिने आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांवर गारुड घातलं होतं.

 

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *