सुरू होतं Facebook Live, अचानक अभिनेता करू लागला आत्महत्येचा प्रयत्न…

सुरू होतं Facebook Live, अचानक अभिनेता करू लागला आत्महत्येचा प्रयत्न…

बंगाली अभिनेता सुवो चक्रवर्ती (Suvo Chakraborty) याने फेसबुक लाइव्हदरम्यान (facebook live) आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. सुदैवाने त्याला यातून वाचविण्यात आलं आहे.

पोलिसांच्या यशस्वी प्रयत्नामुळे सुवोला आत्महत्येपासून वाचविण्यात आलं आहे. त्यांने फेसबुकवर आत्महत्या करण्याचं कारण सांगितलं होतं. ते वैयक्तिक कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होता, त्यातूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.



या कारणामुळे करीत होता आत्महत्या

फेसबुकच्या लाइव्ह (facebook live) सेशनमध्ये त्यांनी सांगितलं की, तो हातात काम नसणे आणि वडिलांच्या मृत्यूमुळे तो त्रस्त होता. आपली चिंता व्यक्त करीत त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

रिपोर्टनुसार एक फेसबुक यूजरने फोनवर पोलिसांना संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. यानंतर कलकत्ता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुवो चक्रवर्ती (Suvo Chakraborty) चा जीव वाचवला.



सुवोने (Suvo Chakraborty) आपल्या फेसबुक व्हिडीओचा टायटलमध्ये ‘आय क्विट’ (I quit) लिहिलं होतं. व्हिडीओमध्ये पहिल्यांदा ते गिराट वाजवत होते. सोबतच गाणं गुणगुणत आहे. त्यानंतर ते होणारा त्रास शेअर करतात.

प्रत्येकाच्या घरात ही समस्या आहे. माझी आई सांगते की, तिचा मुलगा 31 वर्षांचा बेरोजगार आहे. गेल्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आम्ही पेन्शनच्या पैशांवर जगत आहोत.

सुवो चक्रवर्ती (Suvo Chakraborty) कडे गेल्या वर्षीपासून काम नाही. त्याने ‘मंगल चंडी’, ‘इराबोटिर चुपकोथा’, ‘मनासा’ सारख्या बंगाली मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मंगल चंडी’ गेल्या वर्षी ऑफ एयर झाला होता. ज्यानंतर सुवो चिंतेत होता.



व्हिडीओमध्ये सुवो चक्रवर्ती (Suvo Chakraborty) म्हणाला की, जेव्हा कोणी उदास असतं, तर त्याची जगण्याची इच्छा निघून जाते. मी हे केवळ दिखाव्यासाठी करीत नाही. मी खरंच झोपेच्या गोळ्या घेत आहे.

नस कापणे, गच्चीवरुन उडी मारणे हे मला आवडत नाही. शेवटी मला झोपेच्या गोळ्या मिळाल्या. ज्या लोकांना उच्च रक्तदाब असतो त्यांना कार्डिअॅक अरेस्ट होण्याची शक्यता असते.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *