अजित पवारांनी सर्वांसमोरच घेतली शाळा….

अजित पवारांनी सर्वांसमोरच घेतली  शाळा….

उपमुख्यमंत्री अजित पवार  हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट खटकली तर ती समोरासमोर बोलून दाखवायची अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांच्या याच स्वभावाचा परिचय पुन्हा एकदा आला (real clear politics) आहे. निमित्त होते पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या नुतनीकरणीकृत इमारतीच्या उद्घाटनाचे.अजित पवार यांनी नुकतेच पोलीस मुख्यालयाच्या नुतनीकृत इमारतीचे उद्घाटन करून तिथल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी कामात त्यांना काही त्रुटी आढळल्या. त्यामुळं ते नाराज झाले. सोबत असलेल्या कंत्राटदाराची त्यांनी तिथंच कानउघडणी केली. प्लास्टरमध्ये झालेल्या गडबडीबद्दल त्यांनी कंत्राटदाराला सुनावलं. आमच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही अगदी छा-छू काम केलं आहे, असं अजित पवार म्हणाले. ‘
मला अशी कामं बघायला बोलावलं तर मी अगदी बारीक बघतो. चांगलं असेल तर कौतुक करतो नाहीतर… हा माणूस पोलिसांची काम अशी करतो तर बाकीच्याचं काय?,’ अशी नाराजीही त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडं बोलून दाखवली. तसंच, कामातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

करोना काळात सेवेत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव, तसंच करोनानं मृत्यू झालेल्या पोलिसांच्या पाल्यांना पोलीस दलात घेण्याबद्दलचे नेमणूक पत्रही यावेळी अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आलं. करोनाच्या काळात चांगली कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सहा पोलीस निरीक्षक सुहास टिळेकर, पोलीस नाईक, उत्तम गाडे, गौरव कांबळे, शिपाई रेणुका भांगरे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात (real clear politics) आला.यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *