संतापजनक ! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार

संतापजनक ! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार

एका 10 वर्षीय मुलीवर 7 जणांनी बलात्कार (molestation) केल्याची संतापजनक घटना हरियाणामध्ये उघडकीस आली आहे. हरियाणाच्या रामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत.आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हॉट्सॲपवर पाठवला होता. व्हायरल झालेला व्हि़डीओ पीडितेच्या वडिलांनी पाहिल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.व्हिडीओ पाहताच पीडीत मुलीच्या (molestation) वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील रेवाडीच्या रामपुरा पोलीस ठाणाच्या हद्दीत 24 मे रोजी ही घटना घडली आहे.

मुलगी घराजवळच असलेल्या शाळेच्या मैदानात खेळत होती. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या या मुलांनी तिला पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारी मुले ही 8 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील एकजण 18 वर्षांचा आहे. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शूट केला होता.आरोपींनी शूट केलेला व्हिडीओ काही जणांना पाठवला होता. तिथूनच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *