लॉकडाऊननंतर सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी

लॉकडाऊननंतर सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी

देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) ओसरू लागली आहे. देशीतील काही राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, काही ठिकाणी कडक निर्बंधांचं पालन करत कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. (gold silver price today)दरम्यान या काळात सोन्याचांदीचे दर वाढू लागले आहेत. आज सोन्यासह चांदीच्या किंमतीमध्येही जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) शुक्रवारी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 0.20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

सोन्याचा लेटेस्ट भाव (Gold Price Today)

आज एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या वायदे किंमतीत 0.20 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर 49,296 रुपये प्रति तोळा झाले आहेत.चांदीच्या दरात एमसीएक्सवर 0.51 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर प्रति किलो 72,367 रुपये झाली आहे.तसं पाहिलं तर सोन्याचे दर (gold silver price today) रेकॉर्ड लेव्हलवरुन 7000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड हायपेक्षा आता जवळपास 7000 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *