तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित

तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘हसीन दिलरुबा’मुळे चर्चेत आहे. तिने या चित्रपटाशी संबंधीत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. एकंदरीत या पोस्ट पाहिल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.२ मिनिटे २९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये (movie trailor) तापसी पन्नूची कथा दाखवण्यात आली आहे. तापसी राणीच्या भूमिकेत दिसत असून तिने रिशू म्हणजेच विक्रांत मेस्सीशी लग्न केले आहे. पण एका ब्लास्टमध्ये विक्रांतचे निधन होते. विक्रांतचे निधन कसे झाले याचा तपास ‘CID’मधील अभिनेता आदित्य श्रीवास्तव घेत असतो.तपासादरम्यान तापसीचे हर्षवर्धनसोबत अफेअर असल्याचे समोर येते. ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहाता एकंदरीत चित्रपटाची कथा ही रंजक असणार हे दिसत आहे. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहेत. तसेच तापसीने चित्रपटात काही बोल्ड सीन दिले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तापसीला एका वेगळ्या अंदाजात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.‘हसीन दिलरुबा’ हा एक मिस्ट्री थ्रिलर आहे. येत्या २ जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे. आनंद एल राय आणि हिमांशु शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर (movie trailor) पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *