जॅकलिनच्या ‘पाणी पाणी’ व्हिडीओवर राखी सावंतची भन्नाट कमेंट, म्हणाली..

जॅकलिनच्या ‘पाणी पाणी’ व्हिडीओवर राखी सावंतची भन्नाट कमेंट, म्हणाली..

लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस यांच पानी पानी हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातील दोघांची जोडी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. दरम्यान, जॅकलिनने आता त्या गाण्याचा रिहर्सलचा व्हिडीओ शेअर (video share) केला आहे. या व्हिडीओवर बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने एक मजेशीर कमेंट केली आहे.जॅकलिन फर्नांडीसने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅकलिन तिचे कॉरिओग्राफर्स शाहिजा आणि पीयूषसोबत डान्स करताना दिसतं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आता पर्यंत ९ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. 

जॅकलिनच्या या व्हिडीओवर (video share) सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी कमेंट करत तिची स्तुती केली आहे. तर सगळ्यांच लक्ष हे राखी सावंतच्या कमेंटने वेधले आहे. “अप्रतिम, माझं पाणी निघालं जॅकलिन तू खरचं अप्रतिम डान्सर आहेस,” अशी मजेशीर कमेंट राखीने केली आहे.


जॅकलिन लवकरचं ‘अटॅक’, ‘भूत पोलिस’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘रामसेतु’ या चित्रपटात दिसणार आहे. या आधी जॅकलिन सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाच्या एका गाण्यात दिसली होती.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *