कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी

कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कमाल आर खान सतत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर टीका करत आहे. आता केआरकेचं गायक मिका सिंगशी भांडण झालं आहे. खरतरं केआरकेचे सलमान सोबत झालेल्या भांडणानंतर मिकाने केआरकेवर निशाना साधला. दरम्यान, मिकाने एक व्हिडीओ (video on social media) शेअर करत तो केआरकेवर गाणं बनवतं आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरु झाला (entertainment center) आहे.मिकाने बुधवारी त्याच्या गाण्याच्या टिझर हा ट्वीट करत प्रदर्शित केला. या गाण्याचं नाव केआरके कुत्ता असं आहे. हा टिझर शेअर करत हे गाणं ११ जूनला प्रदर्शित होणार. मिकाच्या एका फॅन क्लबने ‘केआरके कुत्ता है’ या गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा व्हिडीओ (video on social media) शेअर करत “मित्रांनो हे गाणं कसं वाटलं,” अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिकाला प्रत्युत्तर देत केआरकेने एक ट्वीट केले आहे. “एवढा काय भुकतोस, पुढे येऊन गाणं प्रदर्शित करण्याची हिमत्त नाही? घाबरू नकोस, संकोच न करता कर! माझी इच्छा आहे की तू फक्त एकदा हे गाणं प्रदर्शित कर! मग बघ!,” असे ट्वीट करत केआरकेने मिकाला धमकी दिली (entertainment center) आहे.हे गाणं आज प्रदर्शित होणार आहे. मिकाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देखील एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ गाणं कशा पद्धतीने बनवल याचा आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *