सिद्धार्थ शुक्ला ठरला TV वरील ‘Most Desirable Man’

सिद्धार्थ शुक्ला ठरला TV वरील ‘Most Desirable Man’

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता, बिग बॉसच्या 13 व्या (Big Boss-13) पर्वातील विजेता हँडसम हंक सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यंदाही टीव्हीवरील मोस्ट डिझायरेबल मॅन (Times of Most desirable man on TV 2020) ठरला आहे. शाहीर शेख आणि पार्थ समथान यांना मागे टाकून सिद्धार्थनं हे स्थान पटकावलं आहे.टॉप 20  मोस्ट डिझायरेबल मॅन 2020 स्पर्धेत त्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे. टीव्हीवरील 20 सर्वाधिक लोकप्रिय पुरुष अभिनेत्यांची ही यादी आहे. अभिनेत्यांची लोकप्रियता, ऑनलाइन मतदान आणि ज्युरींची मते यांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.

छोट्या पडद्यावरील त्याची लोकप्रियता, ऑनलाइन मतदान आणि ज्युरींची मते यांच्या आधारे सिद्धार्थ शुक्लानं हा किताब मिळवला आहे. सिद्धार्थ गेल्या वर्षीही टीव्हीवर टाइम्स मोस्ट डिझायरेबल मॅन होता. आपला अभिनय (Acting) आणि व्यक्तिमत्त्वाच्या बळावर तो गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य करत असून, बिग बॉसचा विजेता ठरल्यापासून त्याची लोकप्रियता अधिक वाढली आहे. सध्या ‘ब्रोकन बट ब्युटीफुल-3’ या वेबसिरीजमधील उत्तम अभिनयाबद्द्दल त्याचं कौतुक होत आहे.मोस्ट डिझायरेबल मॅन 2020 च्या यादीत अव्वल स्थान मिळाल्यानंतर टाइम्सकडं आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, सिद्धार्थनं या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. सलग दुसऱ्या वर्षी टीव्हीवरील मोस्ट डिझायरेबल मॅन अर्थात सर्वात आवडता पुरुष बनण्याचा अनुभव कसा आहे, असं विचारलं असता, त्यानं सांगितलं की, कोणाला सर्वांत आवडती व्यक्ती ठरायला आवडणार नाही. मला कायम या स्थानावर राहायला आवडेल.

यंदाही हे स्थान मिळेल अशी अपेक्षा नव्हती. पण मी माझं काम आनंदानं करतो. माझ्या कामाचा आनंद घेतो. मी प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करतो. त्यांच्यावर मी सर्व काही सोडून दिलं आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मला हे शक्य झालं आहे.’सिद्धार्थनं (desirable man) आपल्या इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांच्या उदंड प्रेमाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले आहेत. त्यानं ‘दिल से’ असं लिहून नमस्काराचा इमोजी टाकला आहे.महिलांमध्ये त्याची लोकप्रियता अफाट आहे.

याबद्दल त्याला विचारले असता, तो म्हणाला, त्यांना माझ्यातील कोणती गोष्ट आवडते हे मलादेखील जाणून घ्यायला आवडेल. माझं स्वतःचं मत विचाराल तर, माझा नो फिल्टर अॅटीट्यूड (No filter attitude) त्यांना आवडत असावा असं मला वाटतं. तुम्हाला मी आवडो किंवा न आवडो मी जसा आहे तसा आहे. माझा हाच इमानदारपणा लोकांना आवडत असावा.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *