हा’ खतरनाक बॉल टाकण्यासाठी परवानगी द्या’, अश्विनची ICC कडे मागणी

हा’ खतरनाक बॉल टाकण्यासाठी परवानगी द्या’, अश्विनची ICC कडे मागणी

टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची (WTC Final 2021) तयारी करत आहे. ही तयारी सुरू असतानाच तो त्याच्या यूट्यब चॅनेलवर क्रिकेटमधील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत (sports news)असतो.यूट्यूबवरील एका कार्यक्रमात अश्विनने ‘दुसरा’ बॉल टाकण्यासाठी मनगट वाकवण्याची मर्यादा 15 अंशापेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे. अश्विनने नुकतीच दक्षिण आफ्रिकेचे माजी परफॉर्मन्स विश्लेषक प्रसन्ना अगोराम यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्याने ही मागणी केली.अश्विनने या चर्चेमध्ये सांगितले की, “आपण ‘दुसरा’ बंद करणे योग्य नाही, तर उलट अन्य स्पिनर्सना योग्य प्रकारे कोपर वाकवण्याची परवानगी द्यायला हवी. यामध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सर्वाना मायनस 15 ते 20-22 अंशापर्यंत बॉलिंगची परवानगी द्यायला हवी.” अगोराम यांनीही अश्विनच्या मागणीला पाठिंबा दिला. स्पिनर्सनी जबाबदारी ‘दुसरा’ बॉल टाकला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

बॉलर्सनाही स्वातंत्र्य हवं

अगोराम यांनी यावेळी सांगितले की, “मला बॅट आणि बॉलमध्ये योग्य संतुलन बघायचं आहे. बॉलर्सना देखील बॅट्समनप्रमाणे स्वातंत्र्य हवे. मला बॉलर्सनी टी 20 क्रिकेटमध्ये 125 धावसंख्येचं संरक्षण केलेलं पाहायचं आहे. (sports news)


पाकिस्तानच्या बॉलर्सची केली प्रशंसा

अश्विनने यावेळी पाकिस्तानचा माजी स्पिनर सकलेन मुश्ताक हा ‘दुसरा’ बॉल योग्य पद्धतीने टाकणारा बॉलर होता, असे सांगितले. शोएब मलिक हा देखील वैध दुसरा टाकणारा आणखी एक स्पिनर होता. मात्र नंतर त्याने बॅटींगवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली, असे अश्विनने सांगितले.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *