कोल्हापूर जिल्ह्यात कडक ‘वीकेंड लॉकडाऊन’; हे सुरू, हे बंद

कोल्हापूर जिल्ह्यात कडक ‘वीकेंड लॉकडाऊन’; हे सुरू, हे बंद

राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधस्तरानुसार (restriction) गेल्या आठ दिवसांपूर्वी चौथ्या श्रेणीत असलेला कोल्हापूर जिल्हा चौथ्या श्रेणीतच राहील, अशी शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात ‘वीकेंड लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी केली जाईल, अशी शक्यता आहे. शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी 5 ते सोमवारी (दि. 14) सकाळी 7 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील, याबाबतचा निर्णय उद्या होणार आहे.कोरोना रुग्ण सरासरी पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड व्यापलेली संख्या यावर राज्य शासनाने एक ते पाच श्रेणीत जिल्ह्यांची विभागणी केली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश चौथ्या श्रेणीत झाला आहे. दर गुरुवारी आकडेवारीचा आढावा घेऊन राज्य शासनाकडून दर शुक्रवारी नव्याने श्रेणी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार त्या त्या जिल्ह्याला त्या त्या श्रेणीनुसार असलेली नियमावली लागू होईल.चौथ्या श्रेणीसाठी अत्यावश्यक सेवेतील (restriction) दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कडक करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सुरू केलेल्या सेवा ‘वीकेंड लॉकडाऊन’ कालावधीत बंद राहणार आहेत.

हे सुरू राहणार
अत्यावश्यक सेवेतील दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी, पार्सल सुविधा, सार्वजनिक वाहतूक, खासगी प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, सध्या सुरू असलेले उद्योग.हे बंद राहणार
सलून, ब्यूटी पार्लर, व्यायामशाळा, कृषी व कृषीपूरक सेवा, चित्रीकरण, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, मॉर्निंग वॉक, सायकलिंग, अत्यावश्यक अतितातडीच्या कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *