आमदार आवाडे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली ही महत्वाची मागणी

आमदार आवाडे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली ही महत्वाची मागणी

आमदार आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची (hospital) देखभाल दुरुस्ती व आवर्ती खर्चासाठी 55 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश दिल्याबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांचे आभार मानत हा निधी (fund) तातडीने देण्याची मागणी केली. त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे इचलकरंजीसह हातकणंगले, शिरोळ तालुके व नजीकच्या सीमाभागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

Advertisement

याठिकाणची बेडची क्षमता 200 असताना दररोज 280 ते 300 रुग्ण येत असतात. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरु असल्याने येथील बेड क्षमता 300 पर्यंत वाढविण्याची मागणी सातत्याने केली आहे. शिवाय या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य सेवा उपसंचालक यांनी या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून तो प्रलंबित असल्याचे सांगत त्याला मंजूरी देण्याची मागणी केली.

रुग्णालयातील (hospital) वाढती संख्या पाहता येथील स्टाफ अपुरा पडत आहे. याठिकाणी विविध 96 पदे गत पाच वर्षांपासून रिक्तच आहेत. रुग्णालयात आवश्यक (medical equipment) त्या सुविधा उपलब्ध असताना केवळ स्टाफ नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही.शिवाय 15 ते 20 वर्षे काम केलेल्या विविध 42 कर्मचार्‍यांच्या समावेशनाचा प्रश्‍नही अद्याप प्रलंबित असून त्या संदर्भातील वस्तुस्थितीची तपासणी करुन त्यांना कामावर हजर करुन घ्यावे, अशी मागणीही आमदार आवाडे यांनी केली.

याप्रसंगी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, आरोग्य सभापती संजय केंगार आदी उपस्थित होते.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *