Rajesh Khanna death anniversary – राजेश खन्ना यांचे हे होते शेवटचे शब्द

rajesh khanna

बॉलिवूडमधले सर्वात पहिले मेगास्टार..ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना आपलंसं केलं.बॉलिवूडमध्ये ‘काका’ नावाने प्रसिद्ध झालेले दिवंगत अभिनेते राजेश खन्ना (death anniversary) यांनी जो स्टारडम पाहिला तो कदाचित कोणत्याच सुपरस्टारच्या नशिबात आला नसेल. अभिनेते राजेश खन्ना यांनी जगाचा निरोप घेऊन आज नऊ वर्ष पूर्ण झाले.

Advertisement

आजच्याच दिवशी म्हणजेच १८ जुलै २०१२ रोजी त्यांचं निधन झालं. मेगास्टार राजेश खन्ना आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट आणि गाण्यांच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनात अजुनही जिवंत आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमीत्ताने आम्ही सांगणार आहोत  जगाचा निरोप घेताना काय होते त्यांचे शेवटचे शब्द.अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉग लिहिलं होतं की, जेव्हा ते राजेश खन्ना यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते, त्यावेळी त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितलं, “राजेश खन्ना यांचे शेवटचे शब्द होते, टाईम इज अप, पॅक अप!”

१८ जुलै २०१२ रोजी ज्यावेळी राजेश खन्ना (death anniversary) त्यांच्या अंतिम प्रवासासाठी निघाले होते, त्यावेळी त्यांचे कुटुंबीय, जवळच्या मित्र परिवारांसह फॅन्सनेही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांचा हा अंतिम प्रवास पाहून फॅन्सच्या डोळ्यात अश्रू झिरपत होते.

मुसळधार पावसातसुद्धा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडकरांसह फॅन्सची रिघ लागली होती. अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र, शाहरुख खान, ऋषी कपूर, सलमान खानसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी काकांना अखेरचा निरोप दिला होता.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *