इचलकरंजीसाठी थोडी दिलासादायक बातमी

इचलकरंजीसाठी थोडी दिलासादायक बातमी

प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध एकोणीस भागात २४ रूग्ण (corona cases) आढळून आले. तर हत्ती चौक परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय वृध्देचा कोरोनाने झाला. शनिवारी रूग्ण संख्या कमी आल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement



प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या हवालानुसार जवाहरनगर, महेशनगर प्रत्येकी तीन, लक्ष्मी व्यंकटेश नगर, कृष्णानगर, शहापूर या भागात प्रत्येक दोन रूग्ण (corona cases) तर आदर्श कॉलनी, ढवळे हॉस्पिटल परिसर, गोकूळ चौक, लिंबू चौक, जुना चंदूर रोड, थोरात चौक,

वखार भाग, स्टेशन रोड, सर्वोदय नगर, नारायण पेठ, दाते मळा, अमराई मळा आदी भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. सध्या ३५७ रुग्णांवर उपचार सुरू असून शहरात आज अखेर रुग्णांची संख्या ८,७४१ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *