पाहा लिपस्टिकमधल्या धोकादायक केमिकल्सची यादी

पाहा लिपस्टिकमधल्या धोकादायक केमिकल्सची यादी

प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये एकतरी लिपस्टीक (Lipstick) असतेच. कुठे बाहेर जायच असेल, पार्टी असेल तर महिला आपल्या ओठांवर लिपस्टीक लावतातच. ब्युटी प्रॉडक्टमध्ये (Beauty Product) सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे लिप्स्टिक. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या काही महिलांसाठी लिपस्टिक रोजच्या मेकअपचा (Makeup) भाग असते.

Advertisement

लिपस्टिकचा छोटासा टच आपला पूर्ण लूक बदलून ठाकतो (Look Change). मात्र ज्या प्रकारे ब्युटी प्रॉडक्टच्या वापरामुळे साईड इफेक्ट (Side Effects) होऊ शकतात त्याचप्रमाणे लिपस्टिकनेही होतात. लिपस्टिक बनवण्यासाठी केमिकल (Chemical) वापरले जातात. त्यात आपल्या ओठांवर थेट लागत असल्यामुळे पोटातही जाऊ शकते आणि यातल्या केमिकल्समुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो.

यातील मॅग्नीज, कॅडमियम, क्रोमियम आणि ॲल्युमिनियम यासारखे घटक आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक आहेत. त्यामुळे लिपस्टिक लावलेल्या ओठांनी आपण जेव्हा जेवतो त्यावेळेस हे पदार्थ आपल्या अन्नपदार्थ बरोबर पोटात जाणेची शक्यता जास्त असते. त्यामुळे लिपस्टिक घेताना त्यात कोणते केमिकल आहेत हे नक्की जाणून घ्या.

सांगली जिल्ह्यातील या गावात कडक लॉकडाउन

कॅन्सरचा धोका

लिपस्टिकमध्ये (Beauty Product) बऱ्याच प्रमाणामध्ये लिड म्हणजेत शिसं वापरलं जातं. लिड शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. बऱ्याच लिपस्टिकमध्ये शरीराला अत्यंत हानिकारक असणारे केमिकल असतात. यामुळे हायपर टेन्शन किंवा हृदयाशी संबंधित त्रास होऊ शकतात. लिपस्टिक बनवताना विविध प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. या प्रिझर्वेटिव्ह मुळे कॅन्सरचा धोका (Cause Of Cancer) देखील वाढतो. दररोज लिपस्टीक लावणाऱ्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.Rajesh Khanna death anniversary – राजेश खन्ना यांचे हे होते शेवटचे शब्द

लिपस्टिकमध्ये बिस्मत ऑक्सीक्लोराईड नावाचा प्रिझर्वेटिव्ह वापरला जातो. यामुळे ही कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. शिवाय या केमिकल मुळे ऍलर्जी होऊ शकते.

प्रेग्नन्सीच्या काळात मुळीच वापरू नका

गर्भवती महिलांनी लिपस्टिक वापरू नये. काही कारणास्तव लावायची असेल तर चांगली ब्रँडेड लिपस्टिक लावावी. शक्यतो हर्बल लिपस्टिकचा वापर करावा.

हे लक्षात ठेवा

  • लिपस्टिक खरेदी करताना त्यामध्ये कोणते केमिकल्स वापरलेत त्याची माहिती घ्यावी.
  • डार्क शेडच्या लिपस्टिकमध्ये हेवी मेटल्स वापरले जातात. त्यामुळे शक्यतो लाईट शेडची लिपस्टिक वापरावी.
  • ओठांवर लिपस्टिक लावण्याआधी तूप किंवा लीप बाम लावा. यामुळे साईड इफेक्टचा धोका कमी असतो.
  • स्वस्तातली लिपस्टिकचा खरेदी करू नका. कारण यामध्ये चांगल्या प्रतीचे केमिकल्स वापरले असतीलच असं नाही. ब्रॅन्डेड लिपस्टिक घेताना त्यातले इनग्रेडिएन्ट जरूर पहा.
Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *