काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका

काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेनेही उत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या वादात आता काँग्रेसनेही (political party) उडी घेतली आहे.

Advertisement

“काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, याचा तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी” असं खोचक वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आली? असा सवाल शिवसेनेने विचारला होता.“खासदार अमोल कोल्हे म्हणतात पवार साहेबांमुळे (Sharad Pawar) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत, पण कृपा करुन दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका, काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात. तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी” असं ट्वीट डॉ. राजू वाघमारे यांनी केलं आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *