सांगली जिल्ह्यातील या गावात कडक लॉकडाउन

lockdown

सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील १७४ गावांत कडक लॉकडाऊन कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील 174 गावांत कडक लॉकडाऊन (lockdown)करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Advertisement

या गावांत ये-जा करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच व्यापार व वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात येणार आहेत. आदेशाची अंमलबजावणी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाने सुरू केली आहे.

आदेशाचा भंग केल्यास पोलिसांना कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. आज रविवारपासून पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे : शिराळा तालुका – शिराळा, सागाव, मांगले, बिऊर, बिळाशी.
वाळवा – बोरगाव, साखराळे, बनेवाडी, मसुचीवाडी, ताकारी, गोटखिंडी, मर्दवाडी, मिरजवाडी, बावची, वाळवा, नवेखेड, जुनेखेड, अहिरवाडी, कामेरी, येडेनिपाणी, गाताडवाडी, तुजारपूर, शिरटे, किल्ले मच्छिंद्रगड, येडेमच्छिंद्र, तांबवे, कासेगाव, वाटेगाव, नेर्ले, काळमवाडी, बहे, कापूसखेड, पेठ, सुरुल,ओझर्डे, रेठरेधरण, चिकुर्डे, ऐतवडे खु, कुरळप, वशी, येलूर, तांदुळवाडी, कुंडलवाडी, बहादूरवाडी, कणेगाव, बागणी, ढवळी, फार्णेवाडी, कोरेगाव, आष्टा, इस्लामपूर या 46 गावांचा समावेश आहे.

पलूस तालुका- पलूस, कुंडल, रामानंदनगर, सांडगेवाडी, बांबवडे, माळवाडी, सावंतपूर, अंकलखोप, भिलवडी, दह्यारी, हजारवाडी, बुर्ली या 12 तर कडेगाव तालुक्यातील कडेगाव, कडेपूर, तडसर, वडियेरायबाग, मोहिते वडगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, शिरगाव, रामापूर, चिंचणी, वाजेगाव, अंबक, आसद, सोनकिरे, सोनसळ, शिरसगाव, वांगी, शेळकबाव, नेवरी, हिंगणगाव बु्र, उपाळे मायणी, धनेवाडी या 22 गावांत कडक अंमलबजावणी  (lockdown) करण्यात येणार आहे.तासगाव तालुका- बोरगाव, आळते, कवठेएकंद, वासुंबे, चिंचणी, हातनोली, विसापूर, पेड, कुमठे, मणेराजुरी, मांजर्डे, आरवडे, सावळज, अंजनी, वडगाव, खुजगाव, दहिवडी, येळावी, निमणी, तुर्ची, बेंद्री या 21 तर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची, कवठेमहांकाळ, देशिंग, नरसिंहगाव, हिंगणगाव, ढालगाव, इरळी, लंगरपेठ, रांजणी, बसाप्पाचीवाडी, करोली टी, कोंगनोळी या 12 गावांत कंटेन्मेंट झोन कडक करण्यात येणार आहे.

खानापूर तालुका- आळसंद, बलवडी, भाळवणी, हिवरे, गार्डी, खानापूर, खंबाळे, माहुली, मंगरूळ, नागेवाडी, वलखड, विटा या 12 तसेच आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी, पिंपरी खुर्द, आटपाडी, मापटेमळा, लेंगरेवाडी, बोंबेवाडी, दिघंची, पुजारवाडी, करगणी, गोमेवाडी, खरसुंडी, नेलकरंजी, जांभुळणी या 13 गावांत ये-जा करण्यास बंदी घातली आहे.

मिरज तालुका- आरग, बेडग, काननवाडी, सावळी, सोनी, एरंडोली, मालगाव, मल्लेवाडी, सुभाषनगर, टाकळी, बामणोली, बिसूर, बुधगाव, कवलापूर, रसूलवाडी, दुधगाव, कवठेपिरान, सलगरे, म्हैसाळ, नरवाड, विजयनगर, हरिपूर, माधवनगर, नांद्रे 24 या गावांत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. जत तालुक्यातील जत, डफळापूर, माडग्याळ, शेगाव, वाळेखिंडी, गुळवंची, बिळूर या 7 गावांत लॉकडाऊन कडक केला जाणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *