नोकरदारांसाठी आनंदाची बातमी

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी

संसदेचं पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) आजपासून सुरू होत आहे. यामध्ये अनेक विधेयकं मांडली जाणार आहेत. ही विधेयकं पारित झाली तर काही नवे कायदेही देशात लागू होतील. नव्या कामगार (employee) कायद्यानुसार नोकरी करणाऱ्यांचा आठवडा 4 दिवस कामआणि 3 दिवस सुट्टी असा होऊ शकतो.

Advertisement

म्हणजे तुमचा वीकेंड गुरुवारपासूनच सुरू होईल आणि तुम्ही शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी सुट्टीचा आनंद लुटू शकता.

1 जुलै 2021 पासूनच हा कायदा लागू करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय होता पण राज्य सरकारांनी तशी तयारी दाखवली नाही. त्यामुळे कदाचित हा कायदा 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू केला जाऊ शकतो. पण जरी तुम्हाला तीन दिवस सुट्टी मिळणार असली तरीही तुम्हाला 4 दिवस 9 ऐवजी 12 तास काम करावं लागेल अशी तरतूद या कायद्यात आहे.या नव्या कामगार कायद्यानुसार नोकरी (employee) करणाऱ्या व्यक्तीने आठवड्यात 48 तास काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे कंपनी आणि कर्मचारी परस्पर सहमतीने कामाचे तास निश्चित करू शकतात.

सांगली जिल्ह्यातील या गावात कडक लॉकडाउन

जर त्यांनी ठरवलं तर दररोज 12 तास काम करून आठवड्यात 4 दिवस कर्मचारी कामावर येऊ शकतात. उरलेले तीन दिवस त्यांना सुटी मिळू शकते. हा निर्णय कंपनीवर सोडण्यात आला आहे पण आठवड्यात 48 तास काम करणं मात्र अनिवार्य आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *