इचलकरंजीच्या वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनाची चिंता वाढली

इचलकरंजीच्या वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनाची चिंता वाढली

इचलकरंजी शहरात कोरोना रुग्णांची संख्या (corona cases) कमी होण्याऐवजी दररोज वाढताना दिसत आहे. रविवारी विविध ३६ भागामध्ये ५८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६४ इतकी झाली आहे.

Advertisement

‘खुलता कळी खुलेना’ ची 5 वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेयर केल्या खास आठवणी

गेल्या काही दिवसापासून शहरात दररोज ३० ते ६० रूग्णांची आहे. रूग्ण संख्या कमी होणे अपेक्षित असताना त्यामध्ये दररोज भर पडत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढताना दिसत आहे. रविवारी ५८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रूग्णांची संख्या (corona cases) ८ हजार ७९९ इतकी झाली असून ८ हजार ४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील या गावात कडक लॉकडाउनआज आढळून आलेल्या मध्ये भोनेमाळ, जवाहरनगरमध्ये प्रत्येकी ५, गावभाग, पुजारी मळ्यामध्ये प्रत्येकी ४, मळा, आयजीएम हॉस्पीटल परिसर ३, शिवाजीनगर, बावणे गल्ली, स्टेशन रोड, सहकार नगरमध्ये प्रत्येकी २ तर शारदा सदन, खंजिरे मळा, अष्टविनायक कॉलनी, मंगळवार पेठ, लालनगर, सांगली रोड, बोहरा मार्केट, आसरानगर, सांगली नाका, राजराजेश्वरी नगर,

Rajesh Khanna death anniversary – राजेश खन्ना यांचे हे होते शेवटचे शब्द

कापड मार्केट, जाजू गारमेंट, आवाडे नगर, नाईक मळा, बंडगर मळा, नटराज चौक, घोडके नगर, तीन बत्ती चार रस्ता, ढवळे हॉस्पीटल, कोल्हापूर नाका, गणेशनगर, विठ्ठल नगर, कृष्णानगर व शहापूरमध्ये प्रत्येकी एक रूग्ण मिळून आला. वाढत्या रूग्ण संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *