100 रुपये द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या, ‘या’ मंत्र्यांनी लढवली आयडियाची कल्पना

100 रुपये द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या, ‘या’ मंत्र्यांनी लढवली आयडियाची कल्पना

एखादी व्यक्ती जेव्हा मंत्री (minister) होते, तेव्हा त्या व्यक्तीला भेटायला येणाऱ्या अनेकांना त्याच्यासोबत सेल्फी (Selfie) काढण्याची इच्छा असते. आपण मंत्र्यांच्या किती जवळचे आहोत, हे दाखवण्यातही अनेकांना रस असतो. याच गोष्टींचा विचार करून मध्यप्रदेशमधील पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर (politics leader) यांनी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे.

Advertisement

‘खुलता कळी खुलेना’ ची 5 वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेयर केल्या खास आठवणी

यापुढे आपल्यासोबत कुणालाही सेल्फी काढायची असेल, तर अगोदर पक्षासाठी 100 रुपयांचा निधी जमा (Rs 100 in party fund) करावा लागेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

Rajesh Khanna death anniversary – राजेश खन्ना यांचे हे होते शेवटचे शब्दअऩेकदा मंत्र्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. कोरोना काळात अशी गर्दी होऊ नये, यासाठीदेखील उषा ठाकूर (politics leader) यांनी ही कल्पना लढवली असावी, अशी चर्चा आहे. मंत्र्यांसोबत सेल्फी काढण्याची हौस तर अनेकांना असते, मात्र त्यासाठी 100 रुपये मोजावे लागणार असतील, तर अनेकजण सेल्फी काढण्यापासून दूर राहतील, असा यामागचा उद्देश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर सेल्फी काढली, तर पक्षाला निधी आणि सेल्फी काढला तर त्रासातून सुटका असा दुहेरी फायद्याचा विचार मंत्रीमहोदयांनी केला असावा, अशी चर्चा आहे.

सांगली जिल्ह्यातील या गावात कडक लॉकडाउन

वेळ वाचवण्यासाठी सुचली कल्पना

एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा मंत्री जातात, तेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेण्याची इच्छा असते. कुणालाही नकार देणं मंत्र्यांना जड जातं. मात्र त्यामुळे पुढच्या कार्यक्रमाला उशीर होतो आणि मंत्र्यांच्या दिनक्रमावरही त्याचा परिणाम होतो. त्यासाठी कमीत कमी लोकांनी सेल्फी काढावा आणि वेळ वाया जाऊ नये, यासाठीदेखील या कल्पनेचा उपयोग होण्याची शक्यता आहे.

आता प्रत्यक्ष किती निधी यातून जमा होतो आणि 100 रुपये मोजून किती लोक मंत्र्यांसोबत फोटो काढायची तयारी दाखवतात, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *