कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून सर्व दुकाने सुरु

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून सर्व दुकाने सुरु

सर्व दुकाने आजपासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर कमी झाल्याने सर्वच व्यापार सोमवारपासून (दि. 19) सकाळी 7 पासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

Advertisement

‘खुलता कळी खुलेना’ ची 5 वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेयर केल्या खास आठवणी

तीन महिने बंद असणारे व्यवसाय सुरू होत असल्याने व्यापार्‍यांत उत्साह संचारला असून, बाजारपेठांमध्ये चैतन्य आले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी पेठांमध्ये दुकाने सुरू करण्यासाठी लगबग सुरू आहे.कोरोना संसर्ग वाढल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या वर गेला होता. त्यामुळे तीन महिने सर्वच व्यापार बंद होता.

सांगली जिल्ह्यातील या गावात कडक लॉकडाउन

…हे सुरू राहणार

  • सराफी दुकाने, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल दुकाने, चप्पल दुकाने, इंटरनेट कॅफे, स्टेशनरी
  • रेडीमेड कापड दुकाने, साडी, गारमेंट
  • स्मॉल्स (मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन बंद राहणार)
  • हॉटेल, रेस्टॉरंटस् पार्सल सेवेला परवानगी (सर्व दिवशी)
  • सार्वजनिक मैदाने, फिरणे, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत
   चित्रीकरणास परवानगी सकाळी 7 ते दुपारी 4 • लग्न समारंभास जास्तीत जास्त 25 लोकांची उपस्थिती
 • व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सेंटर
 • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के आसन क्षमतेसह

…हे बंद राहणार

 • हॉटेल, रेस्टॉरंटस्मध्ये बसून जेवण, नाश्ता नाही
 • राजकीय मेळावे, कार्यक्रमांवर बंदी

 

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *