“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त”

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त”

भाजपाकडून राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (political leader) यांनी मार्गदर्शन केलं. तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

Advertisement

देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत देशात मोदींच्या नेतृत्वाखाली बहुजनांचं राज्य आहे, असं सांगितलं.

ओबीसीची खरा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. ओबीसींना संविधानात स्थान देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.“ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा झाला आहे. रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे.

आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेलं आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. त्यांचे मालक जसं सांगत असतात तसं ते बोलत असतात..”, अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस (political leader) यांनी केली.

मुंबई येथे आयोजित भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, खा. संगम लाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर उपस्थित आहेत.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *