इचलकरंजीकरांनो सावधान…अन्यथा

इचलकरंजीकरांनो सावधान…अन्यथा

रीतसर परवानगी (permission) मिळाल्याने कोरोना संपला की काय, अशा अविर्भावात अनेकजण खरेदीला बाहेर पडले. परंतु ही गर्दी अतिशय धोकादायक असून, यातून संसर्ग वाढल्यास पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू होईल, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.

Advertisement

किरकोळ चुकीमुळे धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.शहरातील अनेक दुकानांमध्ये सर्रास नियम पायदळी तुडविले जात होते.मास्क हनुवटीला, सोशल डिस्टन्सचा फज्जा, सॅनिटायझर नावालाच. त्यातून नियम (rule) सांगणारा एखादा आलाच, तर त्याला तीन महिन्याने आता दुकान उघडले (permission) आहे. थोडातरी धंदा करू द्या की, असे उलट उत्तरही दिले जात होते. नियम आपल्यासाठीच आहेत, याचा विसर पडल्याचे दिसून आले.

 

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *