क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्यानं फसवलं

क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्यानं फसवलं

आभासी चलनात गुंतवणूक (investing in cryptocurrency) केल्यासं बक्कळ फायदा होईल, असं आमिष (Lure of profit) दाखवून पाच जणांनी पुण्यातील एका मॅकेनिकल इंजिनिअरची फसवणूक (Fraud) केली आहे. आरोपींनी फिर्यादी तरुणांला तब्बल 15 लाख रुपयांचा गंडा (15 Lac fraud) घातला आहे.

Advertisement

याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. संबंधित आरोपी मागील चार वर्षांपासून विविध कारणं देतं फिर्यादीची फसवणूक करत होते. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, त्यांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

धीरज जगदाळे असं 48 वर्षीय फिर्यादी व्यक्तीचं नाव असून तो पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्याला आहे. फिर्यादी जगदाळे यांची डिसेंबर 2017 मध्ये एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली.

आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, आभासी चलनात गुंतवणूक केल्यास बक्कळ नफा मिळेल, असं आमिष दाखवलं. तसेच आपण मोनेश क्लासिक नावाचं आभासी चलन (cryptocurrency) बनवल्याचं सांगत त्यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं.पण यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर फर्यादीला काही फायदा झाला नाही. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला बीट कॉइन, वॉलेट, इथोरिअम अॅड्स अशा विविध आभासी चलनांत रक्कम पाठवण्यास सांगितली. आरोपींनी डिसेंबर 2017 पासून आतापर्यंत फर्यादीची वेगवेगळी कारणं देत तब्बल 15 लाख रुपयांची रक्कम लुबाडली आहे.

पण गुंतवणूक केल्याचा फायदा काहीही झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, फिर्यादी जगदाळे यांनी पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *