सोन्याचा दर घटला, चांदी सुद्धा झाली स्वस्त

सोन्याचा दर घटला, चांदी सुद्धा झाली स्वस्त

सोने (Gold) चांदीच्या दरात आज घसरण नोंदली गेली. गुड रिटर्न्सनुसार, बुधवारी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) 47,400 रुपयांवरून कमी होऊन 47,050 रुपये आणि चांदीची (Silver) किंमत 66,600 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

Advertisement

जाणून घ्या तुमच्या शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर

नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली आहे.
चेन्नईत 45,300 रुपये झाली आहे. वेबसाइटनुसार, मुंबईत नवीन भाव 47,120 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत बुधवारी 380 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून 51,330 रुपये झाली, जी मागील व्यवहाराच्या सत्रात 51,710 रुपये होती. चांदी मागील व्यवहारात 67,500 रुपयावरून 900 रुपये प्रति किलोग्रॅम घसरून 66,600 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

गोल्डच्या किंमतीत का झाली घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की डॉलरमध्ये मजबूती आल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण नोंदली गेली आहे. तर, न्यूयॉर्क येथील कमोडिटी एक्सचेंजवर गोल्डच्या दरात झालेल्या घसरणीचा
परिणाम भारतीय सराफा बाजारांवर सुद्धा पडला आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *