आता Amazon वर दररोज 10,000 रुपये जिंकण्याची संधी; सोप्या प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरं

भरपूर व्हरायटी, रास्त किंमत आणि भरघोस प्रमाणात मिळणारी सूट यामुळे अनेक जण ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात. त्यात अॅमेझॉनवर

Advertisement
(Amazon) वस्तूखरेदीला विशेष प्राधान्य दिले जाते. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीअॅमेझॉनकडूनदेखील सातत्याने सेल, ऑफर आणि क्विझ अशा विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यानुसार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या अॅमेझॉनवर (Amazon) डेली अॅप क्विझचे  नवे एडिशन सुरू झाले आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेला अॅमेझॉन सध्या आपल्या क्विझच्या माध्यमातून अॅमेझॉन पे बॅलन्सवर 10,000 रुपये जिंकण्याची संधी देत आहे. ही क्विझ अॅमेझॉनच्या मोबाइल अॅपवर उपलब्ध असेल.

ही डेली क्विझ दररोज सकाळी 8 वाजता सुरू होते आणि रात्री 12वाजेपर्यंत सुरू असते. या क्विझमध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. खूप सारी बक्षीसं जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अचूक द्यावी लागणार आहेत. क्विझमध्ये विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 पर्यायदेण्यात येतात. 20 जुलैच्या क्विझमध्ये विजेत्या ठरणाऱ्या व्यक्तीचं नाव 21 जुलैला घोषित केलं जाणार आहे, तर 21 जुलैच्या क्विझच्या विजेत्याचं नाव 22 जुलैला जाहीर केलं जाणार आहे. हा विजेता लकी ड्रॉमधून निवडला जातो.

अशी खेळा क्विझ

तुमच्या स्मार्टफोनमध्ये AmazonApp नसेल तर क्विझ खेळण्यासाठी सर्वप्रथम हे अॅप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल.

डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर या अॅपमध्ये तुम्हाला साइन इन करावं लागेल.

त्यानंतर अॅप ओपन करा आणि होम स्क्रीनच्या खालील बाजूला स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर सर्वांत खाली तुम्हाला AmazonQuizचा बॅनर दिसेल.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आज (21 जुलै) या क्विझमध्ये विचारण्यात आलेले 5 प्रश्न आणि त्याची उत्तरं आम्ही येथे देत आहोत. त्यामुळे फार वेळ न दवडता क्विझ खेळा आणि 10,000 रुपयांचा Amazon Pay बॅलन्स जिंका.

प्रश्न 1 – भारतीय तटरक्षक दलात नुकतंच समाविष्ट करण्यात आलेलं स्वदेशी बनावटीचं ‘सजग’ हे काय आहे?

उत्तर – पॅट्रोल व्हेसल

प्रश्न 2- माऊंट मेरापी नावाचा सर्वांत अस्थिर ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?

उत्तर – इंडोनेशिया

प्रश्न 3 – संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासात प्रथमच निवडून आलेले पहिले अध्यक्ष अब्दुल्लाशाहीद हे कोणत्या देशातील आहेत?

उत्तर – मालदीव

प्रश्न 4 – या इमारतीची बांधकाम पद्धती कोणत्या प्रकारची आहे?

उत्तर – दगडी बांधकाम (Masonary)

प्रश्न 5 – या सैनिकांनी वापरलेले हे प्रसिद्ध शस्त्रास्त्र कोणत्या प्रकारचे आहे?

उत्तर – कटाना.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *