11GB रॅम, 64MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Vivo Y53s NFC लाँच; जाणून घ्या किंमत

11GB रॅम, 64MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Vivo Y53s NFC लाँच; जाणून घ्या किंमत

Vivo ने गेल्याच आठवड्यात भारतात आपल्या वाय सीरिजमध्ये Vivo Y72 5G स्मार्टफोन (Smartphone) लाँच केला होता. आज या सीरिजमध्ये कंपनीने अजून नवीन स्मार्टफोन जोडला आहे. विवोने जागतिक बाजारात Vivo Y53s NFC लाँच केला आहे. या सीरीजमध्ये Vivo Y53s 4G आणि Vivo Y53s 5G स्मार्टफोननंतर हा तिसरा स्मार्टफोन आहे. आज सादर झालेला विवो वाय53एस एनएफसी एडिशनमध्ये 8GB रॅम आणि 64MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

Advertisement

Vivo Y53s NFC चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y53s NFC मध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा वॉटर ड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. हा विवो फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट दिला आहे.

हा फोन 8 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे, सोबत 3 जीबी वर्च्युल रॅम देण्यात आला आहे. म्हणजे Vivo Y53s NFC फोन 11GB पर्यंत रॅमला सपोर्ट करतो. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते.

Vivo Y53s NFC मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा विवो फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. इंडोनेशियामध्ये हा फोन 3,699,000 IDR मध्ये लाँच केला गेला आहे, ही किंमत भारतीय चलनानुसार सुमारे 19,000 रुपये होते.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *