कोल्हापूर, सातारा, सांगलीत संततधार पाऊस; पंचगंगा दुसऱ्य़ांदा पात्राबाहेर

कोल्हापूर, सातारा, सांगलीत संततधार पाऊस; पंचगंगा दुसऱ्य़ांदा पात्राबाहेर

हवामान खात्याने (Weather-forecasting) दिलेल्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत आज पावसाची संततधार सुरू होती. कोल्हापुरात पंचगंगेचे पाणी आज दुसऱ्य़ांदा पात्राबाहेर पडले असून, पाणीपातळीत दरतासाला दोन इंचांनी वाढ होत होती. सांगली जिल्ह्यांत ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत होत्या. शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सातारा शहरासह जिल्ह्यांत पावसाचे थैमान सुरू आहे.

Advertisement

हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यांत दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. रात्री पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात राहिला, तर दिवसभरात काहीशी विश्रांती घेत पावसाची संततधार सुरूच राहिली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी आज सकाळी दुसऱ्य़ांदा पात्राबाहेर पडले. पाणीपातळीत दरतासाला दोन इंचाची वाढ होत असून, सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची पातळी 32 फूट 2 इंच झाली होती. तर, 39 बंधारे पाण्याखाली गेल्याने एक राज्यमार्ग आणि दोन प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान, नदीची वाटचाल 39 फुटांच्या इशारापातळीकडे सुरू असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यांत आजही पावसाने संततधार हजेरी लावल्याने नद्या-नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. धरण व पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असून, पावसामुळे संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाला आहे.

सांगली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर संततधार सुरू असल्याने जिल्ह्यांत दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाल्याचे दिसून येत होते. पावसाळी हंगामात पहिल्यांदाच आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे सांगली शहरातील अनेक सखल भागांत पाणीच पाणी झाले होते. विशेषतः मारुती रोड, बस स्थानक परिसरात पाणीच पाणी झाले होते. आजचा पाऊस पिकांना उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्य़ांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सातारा, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांत दमदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली असून, जनजीवन गारठून गेले आहे. धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे. तुलनेत दुष्काळी तालुक्यांमध्ये अत्यल्प पर्जन्यवृष्टी आहे.

महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर पाणी

महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘महाबळेश्वरची जीवनवाहिनी’ अशी ओळख असलेला वेण्णा लेक दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ओव्हरफ्लो होतो. मात्र, 2015नंतर यंदा जून महिन्यातच वेण्णा तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाने दडी मारली. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्य़ा आठवडय़ापासून सुरू झालेल्या पावसाची धुवाँधार सुरूच आहे. यामुळे महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्ता हा वेण्णा लेकनजीक पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक मंदावली आहे.

हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यांत दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. रात्री पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात राहिला, तर दिवसभरात काहीशी विश्रांती घेत पावसाची संततधार सुरूच राहिली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी आज सकाळी दुसऱयांदा पात्राबाहेर पडले. पाणीपातळीत दरतासाला दोन इंचाची वाढ होत असून, सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची पातळी 32 फूट 2 इंच झाली होती. तर, 39 बंधारे पाण्याखाली गेल्याने एक राज्यमार्ग आणि दोन प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान, नदीची वाटचाल 39 फुटांच्या इशारापातळीकडे सुरू असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यांत आजही पावसाने संततधार हजेरी लावल्याने नद्या-नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. धरण व पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असून, पावसामुळे संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाला आहे.

सांगली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर संततधार सुरू असल्याने जिल्ह्यांत दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाल्याचे दिसून येत होते. पावसाळी हंगामात पहिल्यांदाच आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे सांगली शहरातील अनेक सखल भागांत पाणीच पाणी झाले होते. विशेषतः मारुती रोड, बस स्थानक परिसरात पाणीच पाणी झाले होते. आजचा पाऊस पिकांना उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सातारा, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांत दमदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली असून, जनजीवन गारठून गेले आहे. धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे. तुलनेत दुष्काळी तालुक्यांमध्ये अत्यल्प पर्जन्यवृष्टी आहे.

महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर पाणी

महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘महाबळेश्वरची जीवनवाहिनी’ अशी ओळख असलेला वेण्णा लेक दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ओव्हरफ्लो होतो. मात्र, 2015नंतर यंदा जून महिन्यातच वेण्णा तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाने दडी मारली. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱया आठवडय़ापासून सुरू झालेल्या पावसाची धुवाँधार सुरूच आहे. यामुळे महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्ता हा वेण्णा लेकनजीक पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक मंदावली आहे.

Advertisement

user

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *