लस डोस घेतलेल्या नागरिकांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून सूट?

लस डोस घेतलेल्या नागरिकांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून सूट?

कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccine) डोस घेतलेल्या नागरिकांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Advertisement

महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ऑक्सिजन लिकेज झाल्यामुळे ठाणे व नाशिकमध्ये काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले.



लसीचे (corona vaccine) दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासासाठी व इतर निर्बंधातून सूट देण्याची मागणी होत आहे. याबाबत चर्चा सुरू आहे. मुंबई लोकल असो की, निर्बंध शिथिल करणे असो, याबाबत कोव्हिड टास्क फोर्सच्या सूचनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही टोपे म्हणाले.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *