सोनं 180 रुपयांनी तर चांदी 900 रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचा भाव

सोनं 180 रुपयांनी तर चांदी 900 रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचा भाव

बुधवारच्या तुलनेत आज सोन्याच्या

Advertisement
(Gold) दरात 180 रुपयांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,120 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,120 रुपये इतका आहे. चांदी च्या भावात 900 रुपयांची घसरण झाली असून आज एक किलो चांदीचा भाव हा 66,600 रुपये इतका झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. सोन्याच्या किंमतीचा विचार करता 16 जुलैला 130 रुपये, 17 जुलैला 150 रुपये, 18 जुलैला 10 रुपये तर मंगळवारी 150 रुपयांची घसरण झाली. सलग चार दिवस सुरु असलेल्या या किरकोळ घसरणीनंतर सोन्याच्या दरात काल 260 रुपयांची वाढ झाली होती तर आज त्यामध्ये पुन्हा 180 रुपयांची घसरण झाली.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये गुंतवणूक कमी झाल्याने तसेच डॉलरचे बळकटीकरण झाल्याने सोन्याच्या किंमती तुलनेने कमीच राहिल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात मात्र मोठी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली. 7 जुलै रोजी चांदीच्या किमतीने पुन्हा एकदा 70 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून आलं आहे. 14 जुलैला चांदीच्या किमतीत 200 रुपयांची घसरण, 15 जुलैला 300 रुपयांची वाढ, 16 जुलैला 200 रुपयांची वाढ झाली होती. 17 तारखेला 1300 रुपयांची घसरण झाली. मंगळवारी चांदीच्या किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली तर बुधवारी पुन्हा एकदा 300 रुपयांची घसरण झाली. आज त्यात 900 रुपयांची घसरण झाली आहे.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *